बिग बींच्या आवाजातील ‘कोरोना कॉलर ट्यून’विरोधात दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल!
मुंबई | नमस्कार आज हमारा पूरा देश और विश्व कोरोनाकी चुनौती का सामना कर रहा हैं….कोणालाही फोन लावला की सर्वात आधी हा आवाज आपल्याला ऐकायला येतो. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली ही ‘कोरोना’ कॉलर ट्यून ऐकून आपल्यापैकी अनेकांना कंटाळा आला आहे. या कॉलर ट्यूनवर अनेक जोक्सही व्हायरल झाले आहेत. आता या कॉलर ट्यून विरोधात दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे.
PIL filed in Delhi High Court seeking the removal of mobile caller tune on #COVID19 awareness in the voice of actor Amitabh Bachchan
— ANI (@ANI) January 7, 2021
कोरोना कॉलर ट्यूनविरोधात याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीचं नाव समजू शकलेलं नाही. काही दिवसांपूर्वी एका वैतागलेल्या नेटकऱ्याने थेट अमिताभ बच्चन यांना ट्विटवर प्रश्न विचारला होता की, ही कॉलरट्यून नक्की कधी बंद केली जाणार आहे. अमिताभ बच्चन यांनी विनम्रपणे त्या व्यक्तीला सांगितलं, ‘माझं काम फक्त व्हॉइस ओव्हर देण्याचं असतं. कोणतीही जाहिरात किंवा कॉलरट्यून कधी सुरू करायची आणि कधी बंद करायची याचा निर्णय माझ्या हातात नसतो. तुम्हाला होण्याऱ्या त्रासाबद्दल मी तुमची माफी मागतो.’ दरम्यान एनएनआय वृत्तसंस्थेने या जनहित याचिकेबद्दल ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
कोरोना जेव्हा सुरू झाला तेव्हा नागरिकांना कोरोनाच्या नियमांबद्दल माहिती मिळावी यासाठी ही कॉलर ट्यून सुरू करण्यात आली होती. पण आता कोरोना येऊन 10 महिने उलटून गेले आहेत तरीही ही कॉलरट्यून सरकारकडून बंद करण्यात आलेली नाही.