अडुळसा – कफ, श्वास, दमा, खोकला, कमी करणारी वनस्पती!

Spread the love

वासा, सिंहास्य, वाजिदन्त, वृष, आटरूषक, अडूसा अशी पर्यायी नावे असलेली अडुळसा वनस्पती. बऱ्याचवेळा याचे झाड अंगणात लागलेले दिसते. पांढऱ्या रंगाची फुले याला येतात. पाकळ्यांची रचना अशी असते की फुलं लांबून सिंहाच्या जबड्या प्रमाणे भासतात म्हणूनच सिंहास्य ( सिंहाच्या मुखाप्रमाणे) हे पर्यायी नाव अडुळसाला पडले आहे. याचे मूल, पुष्प, पत्र औषधी म्हणून उपयुक्त अंग आहे. अडुळसा सिरप आपल्या परीचयाचे असेल. कफ कमी करणारे हे औषध अनेकांनी घेतले असेल.

अडुळसा छातीत जमा झालेला घट्ट कफ पातळ करणारा आहे त्यामुळे श्वासवाहिन्या विस्तृत होतात. म्हणूनच श्वास (दमा) खोकला कण्ठरोग यामधे अडुळसा उपयोगी पडतो. अडुळसाचा रस मधासह दिल्याने कफ पातळ होऊन बाहेर पडतो. कफातून रक्त पडत असल्यास व सतत खोकला असल्यास त्यावरही फायदा होतो. अडुळसा कडू तुरट चवीचे असते त्यामुळे कफ कमी करतो. कफामुळे आवाज कमी बसणे यावर अडुळसा रस मध सैंधव चाटण उपयोगी पडते.

अडुळसा रक्तपित्त म्हणजेच नाक तोंड गुद योनी भागातून रक्तस्त्राव होणे यावर श्रेष्ठ औषध आहे. रक्त वाहिन्यांचा संकोच होऊन रक्त थांबविण्याचे कार्य अडुळसा करतो. म्हणूनच आयुर्वेदाच्या कल्पांमधे अडुळसा उपयोग केला जातो.

  • अडुळश्याची पानांचा लेप सूज कमी करणारा तसेच न्यूराल्जिया म्हणजे वात वाहिन्यांमुळे उत्पन्न वेदना करणारा आहे.
  • अडुळसा श्वेतप्रदर, कुष्ठ, दमा, श्वसनाचे आजार अशा विविध व्याधींमधे उपयोगी पडतो.
  • वासावलेह, वासारीष्ट, वासाघृत अशा विविध औषधी कल्पांमधे अडुळसा वापरण्यात येतो.

असा हा वर्षभर हिरवागार राहणारा अडुळसा. फुलला की विलोभनीय दिसणारा तुळशीप्रमाणे नक्कीच अंगणात लावावा.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.