Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

बदलाची सुरवात पावसाने होते आहे का; प्रमोद गायकवाड पाटील?

Spread the love

राजकीय वर्तुळ

संपादकीय:

साताऱ्यात पवार साहेबांची सभा सुरू असतानाच पाऊस सुरू झाला..! त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात बदलाचे वारे वाहू लागले..! आणि पाहता पाहता महाराष्ट्रातील मागील ५ वर्षाची हुकूमशाही एका पावसातील सह्याद्रीने उधळून टाकली…!

पुढे भाजपने बंगालमध्ये देशातील स्वतःच्या पक्षाचे सगळे नगरसेवक पासून आमदार खासदार असेल नसेल तो पश्चिम बंगालमध्ये नेऊन बसवला..! सोबतीला प्रचारक पंतप्रधान सुद्धा ठिया मांडून बसला मात्र दीदी सगळ्यांना पुरून उरली आणि देशातील हुकूमशाही ला जबर असा धक्का देऊ केला..!

महाराष्ट्रात असो किंवा पश्चिम बंगालमध्ये असो भाजपने होईल तितका जोर लावला शक्य होईल ते करून पाहिलं..! तोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती वेळोवेळी वापरून पहिली..! इकडे पवार साहेब आणि तिकडे दीदी भाजपच्या हुकूमशाही ला दडपशाही ला पुरून उरली..!

आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आदरणीय. खा.मा.शरदचंद्रजी पवार साहेबांची मुंबईतील सिल्वर ओक या राहत्या घरी भेट घेतली..! योगायोग असा होता की इथे सुद्धा पाऊस सुरू होता..!

हा पाऊस जरी मौसमी नसला तरी तो घातकच असतो मान्सून परतीचा पाऊस कसा असतो हे शेतकरी १००% खरे सांगू शकतो..! वादळ वारे विजांचा कडकडाट आणि सगळीकडे नुकसानच होईल असाच असतो..! देशातील परिस्थिती पाहता देशातील नरेंद्र मोदी यांची बेमौसमी सत्ता सुद्धा पवार आणि बॅनर्जी यांच्या समीकरनाणे उध्वस्त होईल असेच चित्र निर्माण होतांना दिसत आहे…!

कधी कधी विचार आणि संयम सुद्धा बाजूला ठेवावा लागतो कारण पुढील शत्रू हा भयंकर असेल तर आपल्याला सुद्धा रौद्र रूप हे धारण करावेच लागेल..! शत्रू शांत होईल आणि आपण त्याला प्रेमाने समजावून सांगू अशी आता वेळ तर अजिबातच दिसत नाही..!

आता मुळी करण्याची वेळ आहे..! एकत्र येऊन ही लढण्याची वेळ आहे..! कारण भयंकर राक्षसी वृत्ती असलेला शत्रू जमेल तसे सगळ्यांना संपवण्यासाठी उभा आहे..! कोणाचे कसे विचार कोण कसा हे हेवेदावे विसरून पवार आणि बॅनर्जी हे समीकरण देशातील घटक पक्षांना एकत्र करत असेल तर ही एक नव्या पर्वाची नादी आहे..!

आज सिल्वर ओक वर पत्रकार परिषद सुरू असताना पाऊस सुरू होता तो पुन्हा साताऱ्यातील सभेची आठवण करून गेला..! साताऱ्यातील पावसात भिजलेला सह्याद्री आज ममतेला सुद्धा आधार देत नव्या पर्वाची सुरवात करण्यासाठी मार्गदर्शन करत होता..!

Exit mobile version