उरलीसुरली सेना पण हायजॅक होणार का? राजकीय विश्लेषकांचा दावा..!

Spread the love

मुंबई | राज्याच्या राजकारणात ते अवघड वळण एकदाचं आलं. दोघे एकत्र येणार नाहीत, हे दावे पुसत दोन ठाकरे एका मंचावर आलेत. मराठी भाषेचा मुद्दा केंद्रस्थानी होता. या घडामोडीनंतर राज्यात उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहेत. यातून कुणाच्या पदरात नेमकं काय पडणार? दोन ठाकरे अखेर एका मंचावर आले. मराठी भाषेच्या मुद्यावर मनसे आणि उद्धव सेना 18 वर्षांनी एकत्र आली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हे मनोमिलन असंच कायम राहण्याचे स्पष्ट संकेत दिले. आज काँग्रेसची अनुपस्थिति प्रकर्षाने जाणवली. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची युतीविषयीची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. आजच्या मेळाव्यातून नेमकं कुणाला काय साध्य होणार आहे हे भविष्याच्या उदरात दडलेले आहे. पण राज्यात नवीन राजकीय पर्वाला सुरूवात झाली हे नक्की आहे. राज्यातील या नवीन घडामोडींवर राजकीय विश्लेषकांनी मतं मांडलं आहे. त्यांनी काही ठोकताळे मांडले आणि अंदाज वर्तवले आहेत.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आज एकाच मंचावर आले. त्यांनी फडणवीस सरकारवर भाषिक धोरणावरून टीकास्त्र सोडले. त्यात राज ठाकरे यांनी मुद्देसुद भाषण केले. पण हातचे राखून ते बोलले अशी चर्चा होत आहे. तर उद्धव ठाकरे यांनी टीकेची धार कमी केलेली नाही हे दिसून आले. याविषयी राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे आणि संजय वरकड यांनी भूमिका मांडली आहे.

आघाडीत, आज काँग्रेस पक्षाने दाखवून दिले आहे. ते आज मेळाव्यात सहभागी झालेच नाहीत. काँग्रेसने काढता पाय घेतलाच आहे. आघाडीत बिघाडी सुरू झालेली आहे, असे मत राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी मांडले. शरद पवार राष्ट्रवादी आणि अजित पवार राष्ट्रवादी यांचे मनोमिलन होत की काय, हे अजून कळलेलं नाही. पण येत्या निवडणुकीत ही आघाडी राहणार नाही.

तर राजकीय विश्लेषक संजय वरकड यांनी सुद्धा या विषयावर भाष्य केले आहे. काँग्रेसने आजच्या मेळाव्याकडे पाठ फिरवल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मते, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जशी तडजोड केली, तशी राज ठाकरे करणार नाहीत. दोन्ही ठाकरे एकत्र येण्यात याविषयीची अट असेल. राज्यात सध्या कुठल्याही मोठ्या निवडणुकी नाहीत. महापालिका निवडणुकीचा विषय घेतला तर राज्यातील महत्त्वाच्या महापालिका, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचे फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला महाविकास आघाडी विखुरल्याचे मत त्यांनी मांडले.

मनसेला बळ मिळेल

मराठवाडा आणि विदर्भात मनसेचे अस्तित्व नाही. पण दोघे एकत्र आले तर या भागात मनसेला निश्चितच बळ मिळेल. मनसेची बाजू उजवी राहील. तर शिवसेनेला सुद्धा मरगळ झटकून कामाला लागेल. जय गुजरात म्हटल्याचा परिणाम निश्चितच शिंदे गटावर होईल, असे उन्हाळे म्हणाले. ठाकरे एकत्र आल्याने या पट्ट्यामध्ये शिंदे गटाची पिछेहाट होईल असा अंदाज त्यांनी वर्तवला.

आदित्य ठाकरे यांनी मराठवाडा पिंजून काढला आहे. त्यांनी खेडोपाडी प्रवास केलेला आहे. त्यांचे नेतृत्व आता सिद्ध झालेले आहे. तर अमित ठाकरे अस्तित्व तयार करू पाहत आहे. या युतीचा तरुण पिढीला होईल. मराठवाड्यात, विदर्भात बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्यादृष्टीने जो पक्ष काम करेल, त्याला फायदा होईल, असे मत उन्हाळे यांनी व्यक्त केले.

उरलेली शिवसेना हायजॅक होईल?

उद्धव ठाकरे यांनी राजकारणात पाऊल टाकलेले नव्हते. तर राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे तडाखेबंद भाषण करत होते. त्यानंतर आता 20 वर्षांचा मोठा काळ लोटलेला आहे. या काळात उद्धव ठाकरे यांनी अनेक संकटांना तोंड दिलेले आहे. 2022 रोजी पक्ष खत्म झाला. त्यानंतर ते फिनिक्स पक्षाप्रमाणे उभे राहू पाहत आहेत. त्यामुळे ते तावून सलाखून निघाले आहेत. तर राज ठाकरे हे तावून-सुलाखून निघाले आहेत. पण राज ठाकरे यांचे तसे नाही. त्यांच्या भाषणाला गर्दी नेहमीच होते. पण त्याचे मतात रूपांतर होत नाही. दोघांमध्ये प्रगल्भता वाढली आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंब म्हणून ते एकत्र काहीतरी ठरवतीलच असे राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांना वाटते.

उद्धव ठाकरे यांचे महत्त्व कमी करण्याचा डाव?

तर राजकीय विश्लेषक संजय वरकड यांनी एक वेगळीच शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या मते, राज ठाकरे यांचे महत्त्व वाढवण्यासाठी भाजपाने ही खेळी खेळली आहे. मनसे पक्ष स्थापन झाल्यापासून मुंबई महापालिकेत त्यांना मोठे यश मिळावता आले नाही. त्यात विधानसभेत उद्धव ठाकरे गटाला सेटबॅक बसला. आता ठाकरे यांचे महत्त्व कमी करण्यासाठी दोघांना एकत्र आणण्यात येत आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना मुंबईसह राज्यातील राजकारणातील अस्तित्व टिकवण्यासाठी सुद्धा दोघे एकत्र येणे गरजेचे होते, असे त्यांना वाटते.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.