Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

महाराष्ट्र शासनाच्या महत्वपूर्ण मुख्यमंत्री रोजगार निर्मितीत सारस्वत बँकेचाही समावेश!

Spread the love

मुंबई | महाराष्ट्र शासनाच्या महत्वपूर्ण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये आता सारस्वत बँकेचाही समावेश करण्यात आला आहे. उद्योग संचालनालयाने नुकतेच या संदर्भातील पत्र जारी केले आहे. मराठी तरूण-तरुणींना नवउद्यमी होण्यासाठी सारस्वत बॅंक आधार देणार ही घटना राज्याच्या विकास यात्रेतील मैलाचा दगड ठरेल. शासन-बॅंक भागिदारीचा हा अध्याय जनतेचे कल्याण साधेल. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत अनेक खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांचा समावेश होता. त्यात सारस्वत बँकेचाही या योजनेत समावेश करावा, अशी विनंती सारस्वत बँकेच्यावतीने कऱण्यात आली होती. त्याची दखल घेत उद्योग विभागाला सूचना केल्या असे सुभाष देसाई यांनी सांगितले व सारस्वत बँकेचा या योजनेत समावेश केला गेला.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे ग्रामीण भागातील तरुण-तरुणी, महिला, छोटे मोठे उद्योग सुरू करू शकतात. त्यासाठी शासनाद्वारे १० लाखांपासून ५० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची तरतूद आहे. विशेष म्हणजे या कर्जासाठी कुठल्याही तारणाची अट ठेवण्यात आलेली नाही. शासनाने तारणाची हमी घेतलेली आहे. त्यामुळे या योजनेला प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे. कोविड-१९मुळे उद्भवलेल्या महामारीत अनेक होतकरू तरुणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे तरुणांना आपला छोटासा उद्योग सुरू करून, स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी लागणारे आर्थिक बळ प्राप्त करून देण्यात बँक महत्वपूर्ण भूमिका बजावेल.

Exit mobile version