Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

कोल्हापूर पोलिसांची कोरोनाला टक्कर; 186 पोलीस कोरोनाच्या विळख्यातून बाहेर, तर अजून 47 रुग्णांवर उपचार सुरू!

Spread the love

कोल्हापूर | कोरोनावर मात करायचीच या निर्धाराने सहा महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांचा लढा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील संसर्ग झालेल्या १८६ पोलिसांनी कोरोनावर मात केली. इतकेच नव्हेतर ते कायदा सुव्यवस्थेबरोबर कोरोना विरोधातील लढाई लढण्यास सज्ज झाले आहे. लॉकडाऊनमुळे पोलिसांवर ताण वाढला. संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरासह जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गावर नाकाबंदी केली. जिल्ह्यात, शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी त्याची तपासणीच्या कामात पोलिसांना सक्रिय राहावे लागले. विनाकारण फिरणाऱ्यांना रोखून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम केले. विलगीकरण कक्ष, शासकीय रुग्णालये, कोविड सेंटर येथे बंदोबस्त तैनात होता. होमक्वारंटाईन व्यक्ती बाहेर फिरते अगर बाहेरून आलेल्या व्यक्तींच्या तक्रारीची जातीने दखलही घ्यावी लागत आहे.

त्याचबरोबर अवैध धंदे, गुन्हेगाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम पोलिस करत आहेत. त्याचबरोबर गुन्ह्यांचा तपासासाठी संशयितांकडे चौकशीची प्रक्रिया करावी लागत आहे. अशा सर्व कामात पोलिसांचा वारंवार अनेकांशी संपर्क येत आहे. परिणामी जिल्हा पोलिस दलात कोरोनाचा शिरकाव  झाला. त्याची संख्या बघता बघता सव्वा दोनशेच्या घरात गेली. यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यूही झाला. कोरोनावर मात करायची आहे. खचून चालणार नाही, अशी मनाशी गाठ बांधून १८६ बाधित पोलिस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कोरोनावर मात केली. ते कर्तव्याची जबाबदारी खांद्यावर घेण्यास सज्ज झाले आहेत.

Exit mobile version