Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

एकेकाळी फक्त मजूरांसाठी बनलेली जीन्स मेहनती माणसाची बनलीओळख!

Spread the love

आजच्या अधुनिक फॅशनमध्ये जीन्सला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पृथ्वीवर सर्वात जास्त परिधान केलं जाणार कापड अशी जीन्सची ओळख आहे. एकेकाळी फक्त मजूरांसाठी बनलेली जीन्स मेहनती माणसाची ओळख होती आज ती गरिबांसह श्रीमंतांचीही जीवनशैली बनलेली आहे. गेल्या १५० वर्षांपासून वापरल्या जाणारा जिन्सचा इतिहास बराच रंजक आहे.

‘डेनिम’ नाव एका चुकीमुळं पडलं..

‘डेनिम’ या शब्दाची उत्पत्ती “Serge de Nîmes” पासून झाली आहे. हा एक कपड्याचा प्रकार होता. फ्रन्सच्या ‘नेम्स’ या शहरात एका प्रकारचं फॅब्रिक म्हणजेच कापड बनवण्यात आलं. सामान्य लोकांसह हे कापड मजुरांसाठी बी मोठ्या प्रमाणात बनवलं जाऊ लागलं. लोक त्याला सर्ज फॅब्रिक म्हणू शकत नव्हते. म्हणून हे नाव छोटं करुन डेनिम ठेवण्यात आलं. अशा प्रकारे ‘डेनिम’चा अविष्कार झाला.

१८७० च्या दशकात उशिरा लोएब स्ट्रॉस नावाच्या जर्मन उद्योजकाने पहिल्यांदा जीन्स तयार केली. एवढ्या वर्षांत त्यामध्ये अनेक बदल, सुधारणा झाल्या, त्यामध्ये नवनव्या डिझाइन्स आणण्यात आल्या. ही ट्राउझर सुरुवातीला फक्त कामगार वर्गाला डोळ्यासमोर ठेवून विकसित करण्यात आली होती. भारतात तयार केलेल्या डायपासून तयार केलेला गडद निळा रंग जीन्सना देण्यात आला होता. तसंच, त्याचं कापड टिकाऊ होतं. त्यामुळे जीन्सचं रंगरूप कामगार वर्गासाठी अधिक साजेसं होतं.

इतिहास

इतिहासाची पानं चाळली की आपल्याला समजतं, डेनिमचा अविष्कार १८३७ साली झाला. जगातला सर्वाधिक प्रसिद्ध कपड्याचा ब्रँड म्हणून त्याची ओळख आहे. याचा शोध लावला होता, जॅकब डेव्हिस आणि लिवाई ट्रॉस. त्यावेळी जिन्सचा अविष्कार कामगार आणि मजूरांच्या वापरासाठी केला जात असे. याला जीन्स नाव पडण्या मागं इटलीतील जेनेओ शहर जबाबदार आहे. तिथं या कपड्याला पहिल्यांदा जीन्स असं संबोधण्यात आलं होतं.

स्टाइल

बदलत्या काळात सोबत जीन्सही बदलली, फाटक्या जीन्सची फॅशन मात्र बरीच नंतर म्हणजे १९७० च्या दशकात आली. समाजाच्या प्रति राग व्यक्त करण्यासाठी तेव्हा जीन्स पँटवर ओरखडे ओढून ती फाडली जायची. तिच्याकडे राजकीय सामाजिक चळवळ म्हणून पाहिलं गेलं. मॅडोनासह अन्य काही सेलेब्रिटींनी हा ट्रेंड लोकप्रिय केला. त्यामुळे राजकीय यंत्रणेविरुद्ध व्यक्त केलेल्या रागातून अशा प्रकारे फॅशनचा उदय झाला. सुरुवातीला ही फॅशन करणाऱ्या व्यक्ती जीन्स घरच्या घरीच फाडत असत; पण एकंदर कल लक्षात घेऊन डेनिम कंपन्यांनी नंतर स्वतः फाटक्या जीन्स तयार करून पुरवायला सुरुवात केली आणि त्या ट्रेंडचं व्यापारीकरण केलं गेलं.

१८ व्या शतकात बुट कट जीन्स खुप चालल्या. ही फॅशन बरीच प्रचलन पावली. जीन्स परिधान केल्यानंतर बुटं वापरायला त्रास व्हायचा. त्यामुळं पॅन्ट शिवतानाच बुट कट शिवली जाऊ लागली. हॉलीवूडमुळं बुट कट जीन्स प्रसिद्ध झाल्या. ८० च्या दशकात बेल बॉटम जिन्स जगभरता प्रसिद्दीस पावल्या. युरोपातील आणखी एका पद्धीतीची जीन्स अमेरिकेत बरीच प्रसिद्ध झाली. खास करुन अमेरिकेतील आणि युरोपातील श्रीमंतांनी ही स्टाइल अमेरिकेत आणली. ‘पेंटालून’ म्हणून ही जीन्स ओळखली जायची. अधानिक क्रांतीनंतर जगाच्या कानाकोपऱ्यात जीन्स पोहोचली.

Exit mobile version