Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

इंदापुर तालुका कोरोनाने हादरला; निमगाव केतकीनेही ही उघडले खाते!

Spread the love

इंदापुर | काल इंदापूर मध्ये घेतलेल्या 35 कोरोना नमुन्यांपैकी तब्बल पंधरा जण पॉझिटिव्ह आले आहेत. इंदापुर मध्ये दहाजण कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील 35 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी घेतले होते, या 35 जणांपैकी तब्बल पंधरा जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने इंदापुर मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन दिवसाच्या अंतराने तब्बल पंचवीस जण कोरोनाग्रस्त
आढळणे ही अत्यंत चिंतेची बाब असून काल अकोले येथे
आढळलेल्या कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील 25 पैकी
तब्बल 9 जण कोरोना ग्रस्त आढळले आहेत. तसेच निमगाव केतकी मधील एका रुग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

इंदापूर तालुक्यातील आरोग्याला हादरा देणारी ही घटना असून
आता प्रशासनाने चिंता करण्यासारखी बाब निर्माण झाली
आहे. अकोले येथील डॉक्टर पत्नीच्या संपर्कातील तब्बल 9 जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत या निकटच्या नातेवाईकांना काल इंदापूर मध्ये क्वारंटाई न केल्यानंतर या नातेवाईकांनी तेथील सुविधा वरून गोंधळ घातला होता.

आज त्यापैकी नऊ जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. याव्यतिरिक्त प्रशासनातील महसूल खात्यातील मंडळ अधिकाऱ्यांच्या घरातही तीन जण कोरोना ग्रस्त आढळली आहेत. दरम्यान आरोग्य खात्यातील महत्त्वाच्या दोन अधिकाऱ्यांचे नमुने मात्र निगेटिव आल्याने आरोग्य खात्याला मोठा दिलासा मिळाला आहे मात्र इंदापुरात वाढत्या कोरोना ग्रस्त मुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version