इंदापुर-बारामती तालुक्यामध्ये कोरोनाची स्पर्धा, दिवसेंदिवस रुग्णाची वाढ; त्याचसोबत निमगाव केतकीच्या कोविड सेंटरमुळे नागरिक धास्तावले!

Spread the love

इंदापुर | इंदापूर आणि बारामतीमध्ये जणू काही कोरोना ग्रस्तांची स्पर्धा सुरू असल्यासारखेच वातावरण सध्या दिसत आहे, आज बारामती मध्ये तालुक्यातले 56 जण कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर दोन दिवसापूर्वीच 56 चा आकडा गाठलेल्या इंदापूरने आज त्यापुढची मजल मारत दिवसभरात 69 जण कोरोनाग्रस्त केले. आज सकाळी इंदापुरातील 11 जण कोरोनाग्रस्त आढळले होते. 2 जण बारामती तालुक्यातील तपासणीमध्ये कोरोनाग्रस्त आढळून आले होते, तर सकाळी दोन जणांचा मृत्यू झाला होता. दुपारी ही संख्या 3 वर पोहोचली. तरंगवाडी येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. एकूणच सकाळी 13 जण कोरोनाग्रस्त आढळून आले होते. त्यानंतर दुपारी चारच्या अहवालात चार जण नव्याने कोरोनाग्रस्त आढळून आले होते. त्यामुळे दुपारपर्यंत इंदापुरातील एकूण कोरोना ग्रस्तांची संख्या 17 झाली होती.

निमगाव केतकी येथील कोरोनाची रुग्ण संख्या काही कमी व्हायला तयार नाही. त्याचसोबत निमगाव केतकी हे कोविड सेंटर असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरल्याचे देखील पाहायला मिळत आहे. आज देखील निमगाव केतकी मध्ये सहाजण दुपारच्या अहवालानंतर कोरोनाबाधित आढळले आहेत. आत्ता आलेल्या कोरोना रुग्णामध्ये 40 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी व अकरा वर्षीय मुलीचा समावेश आहे. तालुक्यातील भोडणी येथे 58 वर्षीय पुरुष, गोतंडी येथे 31 वर्षीय पुरुष, कसबा येथे 45 वर्षीय पुरुष, लुमेवाडी येथे 38 वर्षीय महिला, कळस येथे 38 वर्षीय महिला व 48 वर्षे पुरुष, रेडणी येथे 75 वर्षे पुरुष, भरणेवाडी येथे तीस वर्षीय महिला व 13 वर्षीय युवकास कोरोनाची बाधा झाली आहे. इंदापूरच्या शास्त्री चौक येथील तिघेजण कोरोना बाधित असून यामध्ये 75 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला व 23 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

संध्याकाळच्या अहवालात 149 जणांची रॅपीड अॅटीजेन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल 52 जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. आज आढळून आलेल्या 52 कोरोनाग्रस्तांमध्ये निमगाव-केतकी येथील 45 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष, व्याहळी येथील 50 वर्षीय पुरुष व 21 वर्षीय महिला खडकपुरा इंदापूर येथील 53 वर्षीय पुरुष, वरकुटे येथील 59 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. इंदापूर तालुक्यातील काटी गावात तब्बल वीस जण कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये दोन कुटुंबातील सर्वाधिक सदस्य आहेत. आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये 40 वर्षीय पुरुष, तीस वर्षीय महिला, चाळीस वर्षे पुरुष, बारा वर्षीय मुलगी, नऊ वर्षीय मुलगी, 55 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, 35 वर्षी ‘हिला, 17 वर्षीय मुल युवक, 18 वर्षीय युवक, 60 वर्षीय महिला, 16 वर्षीय महिला, 18 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष,38 वर्षीय पुरुष, वीस वर्षीय महिला, 16 वर्षीय महिला, 30 वर्षीय
महिला, 23 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

इंदापूर शहरातील खडकपुरा येथे पाच जण कोरोना बाधित आढळून आले असून यामध्ये 35 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला व 47 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. राधिकानगर येथे तीस वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची बाधा झाली असून चाळीस फुटी रोड येथे 45 वर्षीय महिला, बटर गल्ली येथे 50 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला व 21 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. इंदापूर तालुक्यातील विद्यमान नगरसेवकास देखील कोरोनाची लागण झाली आहे. वनगळी येथे चार जणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये 65 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महिला व तीन वर्षीय मुलाचा समावेश आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.