मुंबई : लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलता, मॉल्स उघडण्यास मिळालेली परवानगी हे पाहता आता पुजा-यांनीही मंदिरे उघडण्यासंदर्भात भूमिका घेतली आहे. पुजा-यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मॉल्स उघडू शकतात तर मग खबरदारी घेऊन मंदिरं का नाही असा प्रश्न राज ठाकरे यांनी राज्य़ सरकारला केलीा आहे. राज ठाकरे म्हणाले, सध्या कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे. जर मंदिर किंवा धार्मिकस्थळे उघडल्यास तेथे भक्तांची गर्दी होईल. या गर्दीला कसे रोखणार? गर्दी टाळण्यासाठी भाविकांवर नियंत्रण कसे ठेवणार? असे प्रश्न राज ठाकरे यांनी पुजा-यांना केले. महाराष्ट्रातील मंदिरं हे लॉकडाउन जाहीर झाल्यापासून बंद आहेत. गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय सरकारने घेतला.
दरम्यान, मार्च महिन्यापासून मंदिरं बंद असल्याने पुजा-यांनी मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे. यासाठी एक शिष्टमंडळ राज ठाकरेंना भेटलं. यावेळी राज ठाकरेंनीहीमंदिरं उघडण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. जर महाराष्ट्रातील मॉल्स उघडू शकता, तर मंदिरं का उघडली जात नाहीत? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे. तसेच योग्य खबरदारी घेऊन महाराष्ट्रातली मंदिरं उघडली पाहिजेत अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे. त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचं शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील मंदिरं सुरु करण्याबाबत राज ठाकरेंकडे निवेदन दिलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी ही भूमिका मांडली आहे.
मंदिरं उघडण्यासाठी राज ठाकरेंना त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचं शिष्टमंडळ भेटलं. त्यांच्या भेटीनंतर पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळानेही समाधान व्यक्त केलं आहे. राज ठाकरेंना भेटल्यानंतर मंदिरं उघडण्याच्या निर्णयाबाबत काहीतरी सकारात्मक घडेल असा आम्हाला विश्वास आहे असं पुजाऱ्यांनी म्हटलं आहे.