तुम्ही भेसळयुक्त चहा तर पित नाही ना? ‘या’ पद्धताने ओळखा चहाची शुद्धता!
26 जुलै | भारतात चहा हे अतिशय महत्वाचं पेय आहे. चहाशिवाय लोकांच्या दिवसाची सुरवातच होत नाही. तर संध्याकाळी, थकवा दूर करण्यासाठी, अगदी पाहूण्यांचं स्वागत सुद्धा चहाच्या कपाने होतं. चहा आरोग्यासाठी चांगला आहेच आणि चहा प्यायल्यामुळे आपल्याला खुप फ्रेश वाटतं. पण ज्या चहाने तुम्ही दिवसाची सुरूवात करता तो चहा खरचं किती शुद्ध आहे किंवा त्यात किती प्रमाणात भेसळ केली जाते याची माहिती आहे का? बाजारात मिळणाऱ्या कितीतरी पदार्थांमध्ये भेसळ असते तसंच, चहा पावडरमध्येही भेसळ केलेली असू शकते. त्यामुळे तोंडाची चव खराब होण्याबरोबर आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळेच घरतच्या घरीच जर तुम्हाला हे कळलं की दिवसातून 2 ते 3 कप पिणारा चहा भेसळयुक्त किंवा बनावट आहे? चहाची शुद्धता कशी तपासायची याची माहिती घेण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा.
टिश्यु पेपरने चेक करा..
एक टिश्यू पेपर घ्या आणि त्यावर दोन चमचे चहा पावडर टाका. या चहा पावडरवर पाण्याचे थेंब सोडा आणि उन्हात ठेवा. थोड्या वेळाने चाहा पावडर बाजूला करा. चहा पावडरमध्ये भेसळ असेल तर, टिश्यू पेपरवर डागांच्या खुणा दिसतील. पण शुद्ध चहा पावडर आपला रंग सोडणार नाहीत.
चहा पावडर घ्या आणि हातावर चोळा..
आपल्या हातात चहा पावडर घ्या आणि बोटांनी हातावर 2 मिनटं चोळा. चोळताना आपल्या हाताला रंग लागला तर, समजा की चहा पावडरमध्ये भेसळ आहे.
पाण्यात मिसळा..
एका ग्लासामध्ये थंड पाणी घ्या आणि त्यात 2 चमचे चहा पावडर घाला. 2 मिनिटं हे पाणी तसचं राहू द्या. पाण्याचा रंग बदलला तर समजा की चहा पावडरमध्ये भेसळ आहे. भेसळ नसेल तर, रंग बदलला नाही.