वरकुटे खुर्द गावात कृषिदूतांनकडून ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन!
श्रीराम कृषी महाविद्यालय पानीव कृषिदूत गौरव मच्छिंद्र हेगडे यांच्याकडून वरकुटे खुर्द गावातील व शेजारील परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे फळबाग व भाजीपाला पिकांबाबत मार्गदर्शन करत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत संचलित श्रीराम कृषी महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम राबवायचा आहे कृषिदूत गौरव मच्छिंद्र हेगडे कडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रात्यक्षिके सादर करीत आहे.
खते देण्याच्या पद्धती,जनावरांचे लसीकरण,गावाचा सर्वे,माती पाणी परीक्षण तसेच कृषी व कृषिविस्तार कार्यक्रम राबवणार आहे. सदरील विद्यार्थी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम पार पाडत आहे कोरोना संदर्भातील सर्व मार्गदर्शक सुचना व नियमांचे पालन करून कार्यक्रम राबवत आहे. कार्यक्रम राबवण्यासाठी श्रीराम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हाके सर कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक धीरज दोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबवणार आहे सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश पाटील,सचिव सौ श्रीलेखा पाटील विशेष कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वणवे यांनी शुभेच्छा दिल्या सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी वरकुटे खुर्द गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व नागरिक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.