Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

Good News; पुण्यातील जम्बो हॉस्पिटलचा आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार जय गणेशा!

Spread the love

पुणे | कोरोनाच्या रुग्णांवर ‘इलाज’ करण्यासाठी उभारलेल्या मात्र, मुहूर्तावरून चर्चेत आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरचा “जय गणेशा” रविवारी म्हणजेच आज 23 ऑगस्ट रोजी होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दुपारी चार वाजता सेंटरचे ऑनलाइन उद्घाटन होणार आहे. त्यानंतर तेथील सेवा-सुविधांची चाचणी पूर्ण होताच रुग्णांना दाखल घेतले जाणार आहे. सेंटरमध्ये आठशे रुग्णांवरील उपचाराची व्यवस्था आहे. मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन होईल. त्यासाठी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) आवारात छोटेखानी कार्यक्रम होणार आहे. तेव्हा महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थिती राहतील.

कोरोनाच्या रुग्णांना वेळेत तेही नेमके उपचार देण्याच्या उद्देशाने ‘सीओईपी’च्या आवारात हे सेंटर उभारले असून, त्याठिकाणी सहाशे ऑक्‍सिजन आणि दोनशे अतिदक्षता विभाग (आयसीयू) बेडची सोय आहे. या सेंटरचे बहुतांशी काम आटोपले आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यातील तपासण्या करण्यात येत आहेत. त्यानंतर प्रत्यक्षात उपचार सुविधा सुरू होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

दरम्यान, १९ ऑगस्टपासून सेंटर सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्थानिक प्रशासनाला दिली. परंतु, त्या मुदतीत ते शक्‍य झाले नाही. त्यावरून भाजपने आंदोलनाचा पवित्रा घेतला; तेव्हा मात्र २४ ऑगस्टपासून सेंटर सुरू करण्याचे आश्‍वासन खासदार गिरीष बापट यांना दिले होते.

Exit mobile version