Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

खुशखबर; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय, अखेर 12 तारखेपासून धावणार विशेष रेल्वे!

Spread the love

नवी दिल्ली | कोरोनामुळे जगभरातील जवळपास सर्वच देशांनी आर्थिक झळ सोसली आहे. या जागतिक महामारीमुळे इतर देशांप्रमाणे भारताचीदेखील अर्थव्यवस्था ढासळली आहे. उत्पन्नाचं प्रमुख साधन असलेल्या रेल्वे प्रवासावर गेल्या पाच महिन्यांपासून निर्बंध आहेत. मात्र, रेल्वे बोर्डानं याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १२ सप्टेंबरपासून ४० नव्या विशेष रेल्वे पेअर्स धावणार आहेत. आणि या विशेष गाड्यांसाठी १० सप्टेंबरपासून रिझर्व्हेशन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी दिली. यादव पुढे म्हणाले, याबाबतची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार ज्या ठिकाणी मोठी वेटिंग लिस्ट आहे, त्याठिकाणी ज्यादा गाड्यांची सोय करण्यात येईल. तसेच परीक्षा आणि राज्य सरकारच्या मागणीनुसार विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जातील.

महिनाभरावर येऊन ठेपलेल्या दसरा-दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने घेतलेला महत्त्वाचा असल्याचे नागरिकांचे मत आहे. मुंबई, दिल्ली, पाटणा, लखनऊ, कोलकाता या मार्गांवर विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. सध्या भारतीय रेल्वेतर्फे देशभरात २३० रेल्वे चालविण्यात येत आहेत. मात्र, येत्या १२ सप्टेंबरपासून ज्यादा रेल्वेगाड्या धावताना दिसतील.

Exit mobile version