Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

Good News; पुण्यात सोमवारपासून लॉकडाऊन होणार सौम्य, नियम पुढीलप्रमाणे!

Spread the love

पुणे | कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. यातील पहिले पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊनची मुदत शनिवारी संध्याकाळी संपते आहे. रविवारी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ नये आणि त्यांना जीवनावश्यक वस्तू खरेदीकरिता वेळ मिळावा याकरिता सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत वेळ वाढवून दिला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करण्याचे आवाहन पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.

शहरातील कोरोनाची साखळी तोडण्याकरिता दहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार, जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या आयुक्तांनी लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहणार, काय बंद राहणार याचे सविस्तर आदेश काढले होते. पहिले पाच दिवस कडक आणि नंतरचे पाच दिवस सौम्य लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यातील पहिल्या पाच दिवसांची मुदत शनिवारी संध्याकाळी संपते आहे. रविवारपासून सौम्य लॉकडाऊन सुरू होणार आहे.

रविवारपासून दुकाने सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत उघडण्यास मुभा देण्यात येणार आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस आल्याने नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ रविवार करिता सकाळी आठ ते संध्याकाळी सहा अशी वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सहा तासांची सवलत प्रशासनाने दिली आहे. सोमवारपासून मात्र सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेतच दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. दुपारनंतर पुन्हा सर्व बंद ठेवावे लागणार आहे. नागरिकांनी नियम व निकषांचे पालन करावे, प्रशासनाला सहकार्य करावे, स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्यावी असे आवाहन पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.

Exit mobile version