गणेशोत्सव; आरती करताना आपण घेतोय का ही काळजी?

Spread the love

पुणे | गणेशाची आरती झाल्यानंतर सर्वाधिक पाधान्याने आरती घेतली जात असते. परंतु हाताला सॅनिटायझर लावून आरती घेणे तुम्हाला महागात पडू शकते. सॅनिटायझरमध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे तुमचा हात भाजण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या कोरोनामुळे हात स्वच्छ करण्यासाठी साबनासह सॅनिटायझरचा मोठा वापर होत आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता वारंवार हात स्वच्छ करणे महत्वाचे ठरत आहे. त्यात सध्या सर्वत्र जल्लोषात लाडक्या गणरायाचे आगमण झाल्याने सोशल डिस्टन्स ठेवत तसेच सर्व नियम पाळत आरती वगैरे धार्मिक विधी होत आहेत. नकळत आरती घेण्याच्या आधी जर हाताला सॅनिटायझर लावले असेल तर अशातून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्वालाग्राही सॅनिटायझर लावल्यास तो पेट घेण्याची शक्यता असते. त्यामुळे भाविकांनी सॅनिटायझर ऐवजी साबणाने हात धुण्याचा सल्ला दिला जात आहे.

आरती करताना ही घ्या काळजी..?
-आरती ओवळताना किंवा घेताना हात व दिवा यामध्ये अंतर ठेवणे आवश्यक आहे. 
-आरतीपूर्वी सॅनिटायझरचा वापर टाळावा. 
-शक्यतो साबन व पाण्याने हात स्वच्छ करावे. 
आरतीचे ताट हाताळणाऱ्याला संबंधित पूर्वसूचना द्यावी. 

सॅनिटायझर पेट का घेतो…?
सॅनिटायझरमध्ये ६० ते ७५ टक्के इथनोल, अल्कोहोल, १५ टक्के ग्लिसरीन, एक ते पाच टक्के प्रोपिलीन ग्लायकोल, ट्राईइथलोमाईन, पाणी, सुवासिक रंग यांचे मिश्रण असते. इथनोल, अल्कोहोल हे ज्वलनशील असून सॅनिटायझरमध्ये तो अधिक प्रमाणात असतो. तसेच हर्बल सॅनिटायझरमध्येही अल्कोहोलचा वापर केलेला असतो. अल्कोहोल त्वचेवर असताना तो भाग आगीजवळ नेल्यास पेट घेऊ शकतो, अशी माहिती विज्ञान मंडळाचे माजी उपप्राचार्य डी. सी. पाटील यांनी दिली .

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.