करमाळा तालुक्यातील बांधकाम कामगारांना राज्य शासनाच्या योजनेतून मोफत भांडी वितरण!
करमाळा | करमाळा राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने करमाळा तालुक्यातील बांधकाम कामगारांना राज्य शासनाच्या योजनेतून मोफत भांडी वितरण करण्यात आले. शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे महिलांना भांड्यांचे किट वाटण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांची उपस्थिती होती.
राज्य शासनाच्या योजनेतून बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना आहेत यातून बांधकाम कामगारांना मदत होते त्याचप्रमाणे आज करमाळा येथे मोफत भांडी वितरण करण्यात आले. दहा हजार पाचशे रुपयांच्या एका भांड्याच्या सेटची किंमत आहे. असे 43 लाख रुपयांचे भांडे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत महिलांना वाटण्यात आले. तालुक्यातील विविध भागातून शेकडो महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमाला उस्फूर्तपणे महिला तसेच पुरुषांनी देखील सहभाग नोंदवला. सर्व बांधकामकारांनी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आभार मानले. भाषणावेळी शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे यांनी सर्व महिलांना योजना समजावून सांगितली आणि दिलेल्या भांड्यांवर श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा ब्रँड आहे असे ठणकावून सांगितले. महिलांसाठी संघर्ष हा नेहमीच असतो मात्र राज्याचे संवेदेशन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब राज्यातील सर्व महिलांच्या मागे भावाप्रमाणे उभे आहेत असे देखील त्यांनी सांगितले. माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिलांमध्ये जनजागृती केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी देखील उपस्थितांना शासनाच्या योजना आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले. सोबतच करमाळा येथे सुरू करण्यात आलेले नर्सिंग कॉलेज मुलींसाठी मोफत शिक्षण देणारे करमाळा तालुक्यातील पहिले कॉलेज आहे असे देखील त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे, उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे, चिकलठाणा शाखाप्रमुख मोनिका भंडारे, शहर प्रमुख नागेश चेंडगे, आदी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.