Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

सगळ्यांना सर्व आहे माहीत, बलात्काराच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा खुलासा?

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर परिचयाच्या एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. या प्रकरणाची चर्चा सुरु झाल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, आमचे संबंध परस्पर सहमतीने होते; सगळ्यांना सर्व माहीत आहे.

मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये याबद्दल सांगितले की, एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.

सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केली आहे. या सर्व मी सद्भावनेने केले आहे. मात्र २०१९ पासून सदर महिला त्यांची बहीण यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ देखील सहभागी होता. मोबाईल वरून ब्लॅंकमेलिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये मागितल्याचे एसएमएसचे पुरावे माझ्याकडे आहेत. हा दबाव तंत्राचा सुद्धा भाग असू शकतो. या सर्व प्रकरणाची योग्य चौकशी केली जाईल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version