पाणी आडवा पाणी जिरवा बारामतीच्या तांदळवाडी गावचा प्रकल्प झाला सक्सेसफुल!
बारामती | बारामती ता.26-प्रभाग क्रमांक १ तांदुळवाडी गावचे सक्षम नेतृत्व मा.श्री.समीर चव्हाण (नगरसेवक व मा. सार्वजनिक बांधकाम सभापती, बारामती ) यांच्या प्रयत्नांना यश मा. सौ. सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ENVIRONMENT FORUM OF INDIA BARAMATI मार्फत तांदुळवाडी गावात मागच्या २०१९वर्षी ओढा खोलीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती, त्याचे फळ यावर्षी झालेल्या पावसात सर्व ओढे तुडुंब भरले आहेत, यामुळे शेतकरी वर्गाला मोठा फायदा झाला आहे.
जमिनीची खाली गेलेली पाणी पातळी वाढली असून याचा फायदा सर्व नागरिकांना होत आहे. व नक्कीच या प्रकल्पामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवून ही येणार नाही.तसेच तांदुळवाडी मध्ये अनेक प्रकारच्या पाण्याच्या समस्या अडचणी येत होत्या म्हणून नगरसेवक मा.श्री.समीर चव्हाण यांनी मा. सौ .सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन सर्व गोष्टीची चर्चा केली व 2019 मध्ये सर्व कामे पार पाडली व सर्व गावकरी यांनी नगरसेवक मा.श्री.समीर चव्हाण आणि मा.सौ.सुनेत्रा पवार यांच्या कार्यावर ती आनंदी होऊन गावकरी यांनी आभार मानले व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या .