आषाढी वारीपूर्वी एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल, सर्व सेवा- सुविधांचा आढावा घेणार.!

पंढरपूर | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी पंढरपुरात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आषाढी वारी जवळ आल्याने एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमधील सद्यस्थितीची पाहणी केली. भाजपा आमदार Samadhan Autade यांच्यासह ते बुलेटवर मागे बसून पाहणीसाठी रवाना झाले.
पूरस्थितीमुळे आषाढी वारीसाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीची आणि परिसरातील स्वच्छतेची देखील त्यांनी बारकाईने पाहणी केली. आषाढी वारीसाठी मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये येत असल्याने, त्यांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या दौऱ्यामुळे वारीच्या तयारीला अधिक गती मिळेल आणि वारकऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित होईल अशी अपेक्षा आहे.