Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

ईडीची नोटीस; सहानुभूती मिळते आहे – एकनाथ खडसेंनी सांगितली ‘फोन की बात’!

धुळे | चौकशीसाठी ३० डिसेंबरला हजर रहा, अशी नोटीस मिळाल्यानंतर मला अनेक फोन येत आहेत व लोक मझाबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत, अशी फोन की बात राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांनी सांगितली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर दौऱ्यावर असताना, मला ईडीची नोटीस मिळाली आहे, असे खडसे यांनी सांगितले. ते म्हणालेत की, ‘शिरपूर येथील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मला ईडीची नोटीस मिळाली हे खरे असून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात फोन येत आहेत.

मला असे जाणवले की, महाराष्ट्रभरातून मला जे फोन येत आहेत, त्यांच्याकडून सहानुभूती व्यक्त करण्यात येत आहे. लोकांना असे वाटते आहे की, हा अन्याय आहे. वारंवार चौकशा करत राहने लोकांना आवडलेले दिसत नाही, असे ते म्हणालेत.

Exit mobile version