महामेट्रो न्यूज/पुणे |छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची बदनामी करणारे बिडी उत्पादन बंद करावे अशी शिवधर्म फाउंडेशननी मागणी केली असून महाराष्ट्रात 15 जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसेच प्रशासनाला निवेदन दिली आहेत. तसेच मुंबई हायकोर्टात छत्रपती संभाजी बिड़ी वरील धर्मवीर संभाजी महाराजांचे नाव हटविण्यात यावे यासाठी 1 रीट एप्लिकेशन दाखल करत आहोत. असेच ही शिवधर्म फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष दीपक आण्णा काटे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती संभाजी यांच्या नावाने महाराष्ट्रात गेली ८० वर्षांपासून संभाजी बिडी या नावाने धूम्रपान उत्पादन केले जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचं युद्धनीती, लेखन, संपूर्ण जगाला माहिती आहे. असं असताना जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांच्या नावाने बिडी उत्पादन होतं आहे. या बिडीच्या बंडल वर महाराजांचे नावं,फोटो देखील वापरले जात आहेत. तो कागद फाडून फेकला जातो. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान होतं आहे. हा अवमान सहन केला जाणार नाही. या साठी या बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीने नावं बदलून निर्मिती करावे. अशी मागणी शासन दरबारी शिवधर्म फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे. या निवेदनाची दखल घेऊन कारवाई न झाल्यास १ सप्टेंबर पासून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल याचे गमबीर पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळतील असा ही इशारा शिवधर्म फाउंडेशन च्या वतीने देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना शिवधर्म फाउंडेशनच्या अध्यक्ष , उपाध्यक्ष आणि शिवधर्म फाउंडेशन या संघटनेच्या वतीने यासंदर्भात निवेदन दिले जात आहे. महाराष्ट्रात आणि भारतात हिंदू देवदेवता आणि राजे-महाराजे यांच्या नावाने अनेक ठिकाणी अनेक गोष्टींना नाव देऊन त्याचा अपप्रचार , अपमान केला जातो. हे इथूनं पुढं खपुनं घेतलं जाणार नाही असे शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष दीपकआण्णा काटे यांनी पत्रकारांना सांगितले. संभाजी बिडी असो किंवा अजून कोण असो इथून पुढं भारतदेशाचे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज , महाराष्ट्राच्या युवकांचे ह्रदय सम्राट, युवकांचा मान ,अभिमान , स्वाभिमान धर्मवीर संभाजीराजे बद्दल बदनामीकारक व त्यांचा नावाचा वापर करून कोणी व्यवसाय करत असेल किंवा व्यसनासारख्या गोष्टीला नाव देऊन धंदा करत असेल हे खपवून घेतले जाणार नाही.
त्यामुळे संभाजी बिडी या उत्पादन करणाऱ्या कंपनीवर महाराष्ट्र शासनाने कडक कारवाई करावी आणि त्याचं नाव बदलून त्यांनी व्यवसाय करण्यास आमची कुठली हरकत नाही असेही त्यांनी निवेदनात नमूद केलं आहे. येणाऱ्या काही दिवसात संभाजी बिडी या कंपनीने उत्पन्न बंद करून धर्मवीर संभाजीराजे यांच्या नावाने जो व्यवसाय चालू आहे तो बंद करावा आणि शासनाने त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अन्यथा होणाऱ्या परिणामाला शासन आणि संभाजी बिडी उत्पादन करणारी कंपनी व त्यांचे सर्व व्यवस्थापक , मॅनेजर, डायरेक्ट मालक जबाबदार असतील असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे आत्ता संभाजी बिडी या उद्योगावर शासन काय कारवाई करते का ? आणि शासन कारवाई करणार का ? अन्यथा शिवधर्म फाउंडेशन आपल्या स्टाईलने आंदोलन करणार आणि होणाऱ्या परिणामाला नेमकं कोण जबाबदार कोण ? अशी सध्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे. यासंदर्भात शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष दीपकआण्णा काटे यांच्याशी पत्रकारांनी चर्चा केली असता सांगितले की, आम्ही कायदा मानणारी, घटने जो आम्हाला आंदोलन , उपोषण करण्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. आणि घटनेच्या नियमाप्रमाणे आम्ही शांततेत निवेदन दिली आहेत ,शांततेत आंदोलन करणार आहे पण आमच्या आंदोलनाची दखल न घेतली गेली नाही तर आम्ही शिवधर्म फाउंडेशन स्टाईलने आंदोलन करून त्याला जबाबदार सर्व शासन व संभाजी बिडी उद्योग समूह असेल असा आहे त्यांनी इशारा दिला आहे.
तसेच श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीच्या वतीनेही आम्हांला जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.