संभाजीराजे तलवारीचा वापर ओबीसींवर करतात का आणखी कोणावर? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा घणाघाती आरोप!
मुंबई | मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत असल्याचं दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नाही, असा घणाघाती आरोप संभाजीराजे यांनी यावेळी केला. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, वेळ आल्यास तलवार पण काढेन, असे वक्तव्य छत्रपती संभाजीराजे यांनी केले.
या वक्तव्यावरून राजे सर्व जनतेचे असतात, रयतेचे असतात, एका समाजाचे नाही. सर्व समाजाचा विचार राजांनी करावा. आता संभाजीराजे तलवारीचा वापर OBC वर करतात का अजून कोणावर करतात ते बघावं लागेल, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार संभाजीराजे छत्रपतींना टोला लगावला आहे.
आता शाब्दिक वाद थांबवावे, असे मतदेखील भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले .छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, MPSC परीक्षा रद्द करू नये, हे माझे वैयक्तिक मत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला. आपल्याला राज्यात आता हळू हळू सर्व खुलं करायचं आहे. परिस्थिती बघून कमिटी निर्णय घेईल.मात्र, केंद्र सरकारनं दक्षिण भारतातील कांद्याला निर्यात परवानगी दिली आणि महाराष्ट्राला नाही, हा दुजाभाव का? असा सवालदेखील भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला.