Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

आता एकच परिक्षा; सरकारी नोकरीसंदर्भात युवा पिढीसाठी केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय!

The Prime Minister, Shri Narendra Modi delivering his address at the Shanghai Cooperation Organisation Summit (SCO) Summit, in Astana, Kazakhstan on June 09, 2017.

Spread the love

मुंबई | युवा पिढीसाठी मोदी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. सरकारी नोकरी संदर्भात केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे एकच सामायिक परीक्षा CET देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येणार आहे.

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी युवापिढी एक ना अनेक परीक्षांना सामोरे जात असतात. प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपापल्या परीक्षा ठेवतात आणि चांगल्या नोकरीच्या महत्त्वाकांक्षेने तरुण या सगळ्या परीक्षा मोठ्या आशेने देत असतात. आता मोदी सरकारने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे हे चित्र बदलेल अशी शक्यता आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली.

सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी आता सामायिक परीक्षा असेल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था National Recruitment Agency स्थापन करण्यात येणार आहे. या संस्थेत एकदा नोंदणी केली की, एकच परीक्षा देऊन आपली योग्यता युवकांना सिद्ध करावी लागेल. “युवकांना जागोजाही परीक्षा द्यायला जावं लागू नये म्हणून एकच Common Eligibility test असेल. यात गुणवत्ता सिद्ध करून उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल.” अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली.

Exit mobile version