Breking News; इंदापुरसह निमगाव केतकीही बनतेय कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र!
इंदापुर | इंदापुर तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेनदिवस कोरोना बाधिंत रूग्णांची आक्कडेवारी वाढत आहे आज दि २१जुलै रोजी बावडा ग्रामपंचायत हद्दीतील भोडणी ता इंदापुर या गावात कोरोना पाँझिटिव्ह ५५ वर्षीय रूग्ण आढळून आला असून हा व्यक्ती मुंबई या ठिकाणाहून आला होता या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास होता हा व्यक्तीला शारीरिक त्रास जाणवू लागल्याने ही व्यक्ती अकलुज जि सोलापूर या ठिकाणी उपचारासाठी गेली होती अचानक या व्यक्तीला श्ववसनाचा त्रास होऊ लागल्याने छातीत दम लागल्याने या व्यक्तीची कोरोना संदर्भात चाचणी केली असता या व्यक्तीचा कोरोना संदर्भातील रिपोर्ट हा पाँझिटिव्ह आला असल्याची माहिती बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ वाघमारे यांनी दिली आहे .
इंदापुर तालुक्यात आज दि २१ जुलै रोजी प्राप्त झालेल्या कोरोना अहवालानूसार ७६ जणापैकी १३ जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा इंदापुर शहर व ग्रामीण भागातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झालय यामध्ये वरकुटे ९ मदनवाडी १,गोतोंडी १ निमगांव केतकी २ जणांना कोरोनाची लागण झाली आहे इंदापुर तालुक्यात कोरोना वायरसच्या आक्कडेवारीने शंभरी गाठली आहे.अशी माहिती इंदापुर उपजिल्हा रूग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ चंदनशिवे व इंदापुर तहसीलदार सोनाली मँडम यांनी दिली आहे .