Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

अजित पवारांचे मोठं वक्तव्य; गरज पडल्यास पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता?

Spread the love

पुणे | राज्यासह देशात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याने दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने चिंता व्यक्त होत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये कोरोना रूग्ण वाढत आहेत. काही राज्यांमध्ये रात्रीचे कपर्यु जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन किंवा कपर्यु लागू होणार का, अशी चर्चा रंगलेली असताना राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आणि स्थिती पाहून पुढील निर्यण घेतले जातील.

तसेच, त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यताही नाकारली नाही. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी पुण्यात आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती देताना म्हटले की, अहमदाबादमध्ये रात्रीचे लॉकडाउन करण्यात आले आहे. राज्यातील परिस्थितींचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. आणखी 10 ते 15 दिवस स्थितीचा आढावा घेतला जाईल आणि नंतर पुढील निर्णय घेऊ, असे पवार म्हणाले.

लॉकडाऊनवर काय अजित पवार म्हणाले…
अजित पवार म्हणाले, कशा प्रकारची स्थिती समोर येईल, यावर सर्व अवलंबून असल्याने आताच मी काही घोषणा करणे योग्य ठरणार नाही. मी आज काही बोललो तर लोक जास्त त्रस्त होतील. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या किती आणि कशी वाढते यावर पुढचा निर्णय अवलंबून असेल. अधिकाऱ्यांना दिल्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. बंद करण्यात आलेले कोविड सेंटर वेळ पडल्यास पुन्हा तातडीने सुरू करता येईल. या अगोदर व्हेंटिलेटर बेड, साधे बेड खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून दिले होते, गरज पडल्यास या ठिकाणी पूर्ण क्षमतेने सुविधा उपलब्ध केल्या जातील.

Exit mobile version