इंदापुर तालुक्यासाठी दिलासादायक बातमी; अखेर इंदापुर उपजिल्हा रुग्णालयात 39 अाँक्सिजन सुविधायुक्त बेड कार्यान्वित!
इंदापूर | इंदापूरमध्ये गेल्या अनेक दिवसापासून आँक्सिजन वाचून कोवीड रुग्णांचा मृत्यू होत आहे अशा चर्चांना इंदापूर शहरात समोर आले असताना आता अशा चर्चांना पूर्ण विराम मिळणार आहे. कारण आज पासून इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात स्वतंत्र अत्याधुनिक कोवीड केअर सेंटर कार्यान्वित झाले आहे. इंदापूर तालुक्यातील वाढती कोरोनाची संख्या पाहता जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दि.03 सप्टेंबर रोजी इंदापूरात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पथकासमवेत तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत आरोग्य
विभागाकडून सोमवार दि.07 पर्यंत उपजिल्हा रूग्णालयात 26
अाँक्सिजन सुविधायुक्त बेड निर्माण केले जातील असा शब्द उपजिल्हा रुगणालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुहास शेळके यांनी दिला होता.आज प्रत्यक्षात इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या टीम दिलेला शब्द खरा ठरवत 26 नव्हे तर 39 अत्याधुनिक आँक्सिजन सुविधायुक्त बेड सज्ज केले असुन आज सायंकाळ पासून ते रुग्णांच्या वापरासाठी खुले करणार असल्याचे डॉ.सुहास शेळके यांनी सांगितले. सध्या इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाकडे 50 जम्बो आँक्सिजन सिलेंडर असून 4 वेंटीलेटर मशिन कार्यान्वित केल्या आहेत.तर पुढील दोन दिवसात आणखी दोन वेंटीलेटर कार्यान्वित केले जातील. याच सोबत आणखी दोन वेंटीलेटर मशीन मागवण्यात अाल्या असून त्या लवकरचं उपलब्ध होतील असा विश्वास आरोग्य प्रशासनाने व्यक्त केला आहे. याचसोबत निमगांव केतकी येथे सध्या 30 बेडचे कोवीड केअर सेंटर कार्यान्वित असून पाच बेड आँक्सिजन प्रणाली युक्त आहेत.
परंतु सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 5 वेंटीलेटर मशीन देखील कार्यान्वित आहेत परंतु ते चालविण्यासाठी कोणीही टेक्निशियन उपलब्ध नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात रुग्ण संख्या वाढली तरऑक्सिजन उपलब्धता असल्याने तूर्तास गंभीर रुग्णांचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वासही आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 1100 वर गेली असुन दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत भर पडत आहे. यामुळे प्रशासन देखील कोरोनापुढे हतबल झाले असतानाच याच गोष्टीचा फायदा घेत विविध पातळीतून प्रशासनास टीकेला सामोरे जावे लागले. आजही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आरोग्याच्या तीनतेरा आहेत. कोणत्याही सुविधा नाहीत आणि वाढत्या रुग्णसंख्येला लोकप्रतिनिधी सह प्रशासन जबाबदार अाहे अशी टिका केली आहे. अशातचं इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात आजपासून 39 ऑक्सिजन सुविधायुक्त बेड वापरास चालू होणार असल्याने पुढील काळात निश्चित प्रशानावर टीकेची झोड कमी होईल तर प्रशासनापुढेही रुग्ण संख्या रोखण्याचे मोठे अाव्हान असणार आहे.