Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

भाजप वर कोणताही परिणाम होणार नाही, कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा पक्ष; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला!

मुक्ताईनगर | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी प्रवेश केला . मात्र त्यांच्या प्रवेशाने भाजप वर कोणताही परिणाम होणार नाही किंवा कोणताही नेता भाजपला सोडून जाणार नाही असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले होते. हाजन यांच्या विधानाला खडसे  यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. आगामी काळात कुणाच्या मागे कोण आहे आणि कोण किती सक्षम आहे हे दिसून येईन असे खडसे यांनी सांगितले

खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर अनेक कार्यकर्ते आणि नेते हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. मात्र खडसे हे राष्ट्रवादीमध्ये गेले तरी भाजपा मधील कोणीही नेते त्यांच्या मागे जाणार नाहीत किंवा त्यांच्या जाण्याने भाजपला ही कोणताही फरक पडणार नाही अशा प्रकारच वक्तव्य भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केलं होतं.

गिरीश महाजन यांच्या विधानाचा समाचार घेतांना खडसे म्हणाले, आज कोणताही मोठा बदल दिसणार नसला तरी आगामी काळात मात्र कोणाच्या मागे कोण आहे आणि कोण किती सक्षम आहे हे दिसून येईल. पक्षात कार्यकर्ते टिकवूण ठेवण्यासाठी भाजपच्या नेत्यांना अशी वक्तव्य करावीच लागतात, असे म्हटले आहे .

Exit mobile version