Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता; Ncp आणि BJP मध्ये आमदार फोडाफोडीचे राजकारण!

मुंबई | शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलाच वाद उफाळून आला आहे. सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे.

त्यातच राष्ट्रवादीचे आमदार फोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. तसंच राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोठा खुलासा केला आहे.  मलिक यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नाही, असं सांगतानाच उलट राष्ट्रवादीमध्येच काही आमदार प्रवेश करण्यासाठी आतूर आहेत, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी ट्वीट करून या प्रकारावर खुलासा केला आहे.

राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नाही, असं सांगतानाच उलट राष्ट्रवादीमध्येच काही आमदार प्रवेश करण्यासाठी आतूर आहेत, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी ट्वीट करून या प्रकारावर खुलासा केला आहे.

Exit mobile version