Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

अखेर पवार आणि उद्धव ठाकरेंचं ठरलं, बिहार निवडणूक एकत्र लढणार?

Spread the love
FacebookTwitterGmailInstagramWhatsapp

मुंबई | आगामी बिहार निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमाने कमला लागले आहेत. या निवडणुकीत ५० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय शिवसेनेनं  घेतला आहे. विशेष म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्हदेखील दिले आहे. आता राष्ट्रवादी आणि शिवसेना बिहार निवडणूक एकत्र लढवणार असल्याची चर्चा आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोघांची भेट झाली असून, दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, ठाकरे-पवार बैठक पूर्वनियोजित असल्याची माहिती खुद्द राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली होती. शिवसेना खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात रविवारी चर्चा झाली. या भेटीत बिहार निवडणुकीविषयी चर्चा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

FacebookTwitterWhatsAppShare
GmailLinkedinFacebookTwitterWhatsapp
Exit mobile version