पुणे | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने आज शरद पवार यांच्या बालेकिल्लातील भूषण सुर्वे यांची महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खा. डॉक्टर श्रीकांत शिंदे , शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, मंगेश चिवटे, पुणे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे, शिवसेना पक्षाचे सोशल मीडिया राज्य प्रमुख राहुल कनाल, उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा व सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र प्रमुख महादेव सलवडे यांच्या नेतृत्वाखाली बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सोशल मीडिया प्रमुखपदी निवड करण्यात आली.
भूषण सुर्वे हे मूळचे इंदापूरच्या असून गेल्या सात ते आठ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खा. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे कक्ष प्रमुख तथा एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेशजी चिवटे यांच्या माध्यमातून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख व सोशल मीडिया प्रमुख महाराष्ट्र राज्य या पदांची जबाबदारी सुर्वे यांच्या वरती असून एकनाथ शिंदे यांचे कार्य व शिवसेनेचे कार्य पुणे जिल्ह्यांमध्ये घराघरात पोहोचवण्यासाठी सुर्वे हे प्रयत्नशील असतात, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीमधून एकनाथ शिंदे यांच्या कार्य काळामध्ये भूषण सुर्वे यांनी पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे दीड कोटींपेक्षा जास्त निधी गोरगरीब रुग्णांसाठी मंजूर करून आणला होता यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.
सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला एकनाथ शिंदे व मंगेश चिवटे यांनी वेळोवेळी साथ दिल्यामुळे पवारांच्या बालेकिल्ले देखील एकनाथ शिंदे यांची ओळख घराघरात पोहोचवण्यात देखील सुर्वे यशस्वी झाले आहेत असे सुर्वे यांनी सांगितले.