भिगवण येथे सामजिक कार्याचे भान राखत कोविड सेंटरला आवश्यक असणाऱ्या गोष्टी ग्रामपंचायत आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून भेट!

Spread the love

भिगवण | भिगवन येथील कोवीड सेंटरला ग्रामपंचायतीच्या वतीने 25 गाद्या व आवश्यक साहित्य भेट देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप दादा गारकर यांच्यावतीने वाफेचे मशीन
येथील कोविड सेंटरला देण्यात आले. आज भिगवन ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांच्या संकल्पनेतून वाफेचे मोठं मशीन भेट देण्यात आले. करोणा चा संसर्ग आणि परिसरामध्ये वाढत असलेली कारोना पेशंटची संख्या खूप वाढत आहे. त्यामुळे बेड ची आवश्यकता होती. ही गरज ओळखून ग्रामपंचायतीने आज २५ गाद्या त्याठिकाणी दिल्या आहेत.

या अगोदर पण आवश्यक मदत केलेली आहे, आणि पुढच्या काळात पण आवश्यक मदत केली जाईल असे सरपंच प्रतिनिधी संतोष धवडे यांनी सांगितले. वाफ घेणं हे करोणा साठी खूप गुणकारी असून प्रदिप दादा गारटकर यांच्या संकल्पनेतून इंदापूर शहरामध्ये 10 वाफेचे मशीन देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन बोगावत यांनी दिली यावेळेस जिल्हा परिषद सदस्य हानुमंत नाना बंडगर ,सरपंच प्रतिनिधी संतोष धवडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन बोगावत शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मनोज आण्णा राक्षे,रोहित भैया शेलार, शुभम भैय्या शेलार, रामहरीतात्या चोपडे आदी उपस्थित होते डॉक्टर मृदुला जगताप डॉक्टर जीवन सोरतापे यांनी सदर गोष्टींचा स्वीकार केला त्याचबरोबर करोणाच्या या महामारीतुन वाचण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी कुणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये मास्कचा वापर करावा सोशल डिस्टंसिंग सर्वांनी पाळावे सकाळी आणि संध्याकाळी वाफ घ्यावी अशा प्रकारची विनंती जिल्हा परिषद सदस्य हनुमंत नाना बंडगर यांनी केली.

त्याचप्रमाणे भिगवण रोटरी क्लबच्या वतीने कोविड केअर सेंटरला 25 कॉटची मदत करण्यात आली.

भिगवण परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व वाढती पेशंटची संख्या लक्षात घेऊन भिगवण आणि परिसरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये काॅट (Bed ) ची आवश्यकता होती. हि आवश्यकता लक्षात घेऊन रोटरी क्लब भिगवण ,रोटरी क्लब डेक्कन जिमखाना, रोटरी क्लब पिंपरी, रोटरी क्लब उद्योगनगरी, या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आज भिगवण कोविड सेंटरला 25 नवीन काॅट देण्यात आल्या.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संपत बंडगर, संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, माजी अध्यक्ष प्रदीप वाकसे, प्रवीण वाघ ,डॉक्टर अमोल खानावरे, सरपंच प्रतिनिधी संतोष धवडे, रणजित भोंगळे,संजय खाडे औदुंबर हुलगे, डॉक्टर घोगरे आदी उपस्थित होते. रोटरीयन मंजु फडके व रोटेरीयन नितीन ढमाले यांचे याकामी विशेष सहकार्य लाभले आसे या वेळी सचिन बोगावत यांनी सांगितले. तर कोविड सेंटरला आवश्यक मदत रोटरी क्लबचे माध्यमातून अगोदर पण केली आहे व येणाऱ्या पुढील काळात ही करू असे अध्यक्ष संपत बंडगर यांनी सांगितले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.