मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यवारीचा ताफा निमगाव केतकीमध्ये; आरोग्य सेवेमुळे वारकरी वैष्णवांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक!

Spread the love

इंदापूर | महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आजपर्यंत मुख्यमंत्री झाल्यापासून घेतलेले निर्णय व सर्वच क्षेत्रातील कामगिरी पाहता महाराष्ट्रातील संपूर्ण जनता ही मुख्यमंत्र्यांवरती कौतुकांचा वर्ष करत आहे हे आपण पाहत आहेत, महाराष्ट्राचे वैभव आणि संस्कृती असलेली पंढरीची वारी या वारीमध्येही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी वारकऱ्यांच्या आरोग्य कसे चांगले ठेवता येईल याकडे पहात संत तुकाराम महाराज देहू ते पंढरपूर व संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी ते पंढरपूर या दोन्ही पालख्यांमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, व आरोग्य विभाग यामार्फत आरोग्य वारीच्या 2 गाड्या प्रत्येकी पालखीमध्ये देण्यात आलेले आहेत, व या गाडीसोबत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची समन्वयक वारीच्या प्रत्येक मुक्कामाच्या टप्प्यावरती आरोग्य शिबिराचे आयोजन करून वारकऱ्यांना मोफत औषध वाटप व तपासणी करून आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी हातभार लावत आहे.

हे सर्व पाहता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे कक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेशजी चिवटे यांच्या संकल्पनेनुसार ही आरोग्य वारी आजपर्यंत यशस्वीरित्या आरोग्य शिबिर गेल्या 5 वर्षांपासून यशस्वीरित्या पार पाडत असल्याचे आपण पाहिले आहे. आज निमगाव केतकी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामाला असताना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा कक्ष प्रमुख भूषण सुर्वे त्यांच्या माध्यमातून श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव केतकी येते 1000 पेक्षा जास्त वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामधून कोणकोणत्या आजारांना अर्थसहाय्य केले जाते व हे सर्व निशुल्क आहे यासंबंधीतील माहिती व माहितीपत्रक वारीमध्ये वाटण्यात आले, यावेळी प्रत्येक वारकऱ्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामाचा गौरव व कौतुक ऐकण्यास येत असल्याचे पाहून भूषण सुर्वे यांनी सांगितले.

तसेच या आरोग्यवारीमध्ये निमगाव केतकी येते इंदापूर तालुक्याच्या वैद्यकीय अधिकारी सुरेखा पोळ, शिवशंभू ट्रस्टचे उपाध्यक्ष विवेक शिंदे, दिनेश घाडगे, तसेच शिवसेनेचे राजाभाऊ भिलारे, विशाल जी बोंद्रे, वैद्यकीय सहाय्यक गजानन नारलवार, समीर शेख, ओम अकुसकर, दत्ता खरात, गणेश खंडागळे, राहुल नाकाडे व स्थानिक डॉक्टर सुश्रुत शहा सर यांचे सहकार्य लाभले त्यामुळे आरोग्य शिबीर यशस्वीरित्या पार पडले. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामहरी राऊत सर व नितीन हीलाल यांनी यावेळी शिबिराला धावती भेट दिली.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.