अहिल्या प्रतिष्ठानतर्फे निमगाव केतकीमध्ये विविध सामाजिक उपक्रमातून अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी!
इंदापूर | दिनांक ३१/०५/२०२१रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त अहिल्या प्रतिष्ठान निमगाव केतकी अनावश्यक खर्च टाळून व सामाजिक बांधिलकी म्हणून सकाळी ८:००वाजता वन्यप्राण्यांसाठी पाणी सोडण्यात आले. तसेच राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन म्हणून सकाळी १०:०० राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चौक (निमगाव केतकी -व्याहळी रोड चौक) मध्ये राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चौक असे नामकरण करण्यात आले व प्रतिमापूजन केले. त्यानंतर इंदापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक धोत्रे साहेब यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय निमगाव केतकी येथील सर्व कोव्हिड रुग्णांसाठी वाफ घेण्याचे मिशन वाटण्यात आले त्याच बरोबर रुग्णालयाची गरज ओळखून सिलिंग फॅन हे रूग्णालयाला भेट देण्यात आले.
त्याचबरोबर अहिल्या प्रतिष्ठानतर्फे डॉक्टर आर्कीले व सर्व स्टाफ यांचा सर्वोत्तम कामगिरी व जबाबदारीने काम केल्याने सत्कार करण्यात आला. रणरागिणी म्हणून सर्व नर्सिंग स्टाफ यांचा धोत्रे साहेब यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
दुपारी १२:३० वाजता राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी पिटकेश्वर याठिकाणी बांधलेल्या पाणीपुरवठा विहिरीचे पूजन करण्यात आले, सदर कार्यक्रमासाठी सुवर्णयुग प. संस्थेचे अध्यक्ष दशरथ तात्या डोंगरे, पंचायत समिती सदस्य देवराज भाऊ जाधव, मच्छिंद्र आप्पा चांदने, निमगाव केतकीचे सरपंच प्रवीण डोंगरे, माजी उपसरपंच तुषार जाधव, निमगाव केतकी चे उपसरपंच सचिन चांदणे, तात्यासाहेब वडापुरे ,कचरवाडी गावचे सरपंच पैं. कुंडलिक कचरे k k , कौठळी गावचे उपसरपंच सुनील खामगळ, किशोर आबा पवार , बाबजी भोंग, कपिल हेगडे,अतुल मिसळ, ग्रामपंचायत सदस्य अमोल जी हेगडे ,अमोल राऊत ,सचिन जाधव , अॅड .सुभाष भोंग ,अॅड. सचिन राऊत, अॅड. श्रीकांत करे,अॅड राहुल लोणकर, तुषार खराडे, कुंडलिक शेंडगे ,धनंजय राऊत गणेश घाडगे, संतोष भोसले , सोमा राऊत ,तात्यासाहेब भोंग, संतोष जगताप, राजू जठार सकाळ दैनिक चे पत्रकार मनोहर नाना चांदणे, झी 24tass चे पत्रकार जावेद भाई मुलानी हे उपस्थित होते. वरील सर्व कार्यक्रम हे covid-19 च्या प्रादुर्भावामुळे मोजक्या लोकांमध्ये व covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्स पाळून जयंती उत्सव साजरा करण्यात आले.
अहिल्या प्रतिष्ठान निमगाव केतकीचे अध्यक्ष-ॲड. अनिल (आबा) पाटील, बाबासाहेब पाटील, बबन पाटील, प्रशांत बंडगर, महादेव पाटील, स्वप्नील पाटील, हर्षवर्धन पाटील, आप्पासाहेब पाटील, दादासो पाटील, बाळू पाटील, संजय पाटील, विठल पाटील , दीपक बंडगर,सुहास पाटील, शंकर पाटील , विजय पाटील ,सागर पाटील, अविनाश पाटील, रोहित पाटील, समाधान पाटील, रणजित पाटील, निखिल पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले