सावकारी पैशाच्या वादातून ३०७ खुनाचा प्रयत्न करणे या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता; ॲड.अनिल (आबा) पाटील!
इंदापूर | बळपुडी इंदापूर येथे सन २०१७ मध्ये सावकारकी वादातून झालेल्या भांडणातून खुनाचा प्रयत्न करणे या प्रकरणातील तिघा आरोपींची बारामती येथील अति जिल्हा व सत्र न्यायालय क्र.2 यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केले.
सन २०१७ मध्ये इंदापूर तालुक्यातील गाव मौजे बळपुडी येथे सावकारकी पैशातून झालेल्या वादात तीन आरोपी सदाशिव शंकर देवकाते, आप्पा मारुती करे व लक्ष्मण नाथा खामगळ यांच्याविरुद्ध फिर्यादी यांनी फिर्यादीस व घरातील लोकांना मारहाण करून खुनाचा प्रयत्न केले बाबत इंदापूर पोलिस स्टेशन येथे तक्रार दिलेली होती.त्यानुसार वरील लोकांविरुद्ध भा.द.वि.कलम ३०७,३२६,१४३,१४७,१४९,५०४,५०६ इ.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी सदर खटल्याचा तपास करून बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर खटल्यांमध्ये तिन्ही आरोपींना यांच्यावतीने ॲड.अनिल आबा पाटील यांनी कामकाज पाहिले. या खटल्यामध्ये आरोपीविरुद्ध कोणताही सबळ पुरावा मे. कोर्टा समोर न आल्याने सदर आरोपी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
आरोपी यांच्यावतीने ॲड.अनिल (आबा) पाटील यांनी कामकाज पाहिले . यामध्ये ॲड.प्रसाद खारतोडे यांनी युक्तिवाद केला. सदर खटल्यास ॲड.जयसिंग कचरे,ॲड.प्रशांत खताळ ,ॲड. राजेंद्र मासाळ यांनी कामकाज करण्यास सहकार्य केले.