माणुसकी अजून जिवंत आहे हा प्रसंग बारामती मध्ये घडला!
बारामती | कोरोनाने हाहाकार माजवला असतांना आज सिद्धेश्वर गल्ली स्वामी समर्थ मठा जवळ दोन दिवसांपासून एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला पडली होती त्याच्या जवळ जायला कोणी तयार नव्हते. अनेक लोक येथून येता जाता हळहळत होते पण मदत करायला कोणी तयार न्हवते.
अमोल यादव व त्यांच्या मित्रांनी माणुसकीच्या नात्याने 108 ला फोन करून भिगवण वरून अंबुलन्स बोलावली परिस्थिचे गांभीर्य ओळखुन डॉ राजन सोनवणे व चालक गजानन शेलार यांनी बारामतीला आल्यावर खरी परीक्षा होती की या व्यक्तीला गाडीत ठेवायचे कसं कारण त्या व्यक्तीचा खूप घाण वास येत होता. पण कशाची ही तमा न बाळगता अमोल यादव (लोकमत पत्रकार),श्रीकांत जाधव(अध्यक्ष अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ),राहुल जाधव,मयुर जाधव (बाळा- सिद्धेश्वर गल्ली) विकास चौधरी,हनुमंत गायकवाड,भारत दळवी,अमित परदेशी,प्रदीप आचार्य यांनी सॅनिटायजर व ग्लोज लावून त्याला उचलले आणि त्या व्यक्तीला सरकारी दवाखाण्यात ऍडमिट केले.
सध्या सगळे कोरोना सारख्या भयंकर रोगाचा सामना करत असताना “माणसात माणूस राहिला नसताना” एखादा जीव वाचवण्यासाठी माणुसकी दाखवली त्यांना सलाम त्यांच्या मुळे एका माणसाचा जीव वाचला.