शेळगाव आरोग्य केंद्रास शिवशंभू ट्रस्टच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमा भेट..!!

इंदापूर | महापुरुष या महाराष्ट्राची संस्कृती, आपला अभिमान, आपला स्वाभिमान.. हेच वाक्य डोळे समोर ठेवून श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज इंदापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.
सामाजिक कार्यात शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे कायमच योगदान राहिलेले आहे त्यामध्ये रक्तदान चळवळ इंदापूर तालुक्यामध्ये चालू करण्यासाठी शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे नाव हे प्रामुख्याने घेतले जाते. आणि हे सर्व महापुरुषांच्या कार्यामुळे चालू राहिले असे यावेळेस सुर्वे यांनी सांगितले.
श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष भूषण सुर्वे यांच्या माध्यमातून या प्रतिमा प्राथमिक आरोग्य केंद्रास सुपूर्त करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निमगाव केतकीचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता मिसाळ यांनी केले व शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रवीण डोंगरे यांनी आभार मानले, तसेच या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी प्रतीक्षा देवकर, आरोग्य सहाय्यक राहुल देवकर, आरोग्य सहायिका माधुरी नवले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रीती सुर्वे, औषध निर्माणाधिकारी पूजा गावडे, क्लार्क उर्मिला शिंगाडे व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी तथा आशा सेविका यावेळी उपस्थित होत्या.