मेंढपाळावरती सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे एक पाऊल पुढे; संरक्षणासाठी पिस्तुल परवाना देण्याची केली मागणी!
मुंबई | राज्यातील मेंढपाळ बांधवांचे जे संरक्षण विषयक प्रश्न
आहेत त्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे
प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मंत्रालय येथे
केले. मेंढपाळांना संरक्षण देवून त्यांच्यावरील हल्ले
थांबविण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी
सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित
पवार, माजी आमदार सर्वश्री प्रकाश अण्णा शेंडगे, हरिभाऊ
भदे, रामराव वडकुते, रमेशभाऊ शेडगे, पोलीस महासंचालक
राजेंद्र सिंग,(कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके अति. महासंचालक(कायदा व सुव्यवस्था) व इतर अधिकारी
उपस्थित होते.
यावेळी मेंढपाळावरती सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांना स्वसंरक्षणासाठी फिसतुल परवाना देण्यासाठी मागणी केली आहे
मेंढपाळ बांधवावर होणाऱ्या हल्ल्याबाबत शासन गंभीर असून
त्यांच्या मागण्याबाबत निश्चित सकारात्मक विचार केला जाईल.
हल्ल्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे याकरिता पोलीस यंत्रणेला,
स्थानिक पोलीस स्टेशनला योग्य त्या सूचना देण्यात येतील.
मेंढपाळ वस्तीला असतील त्याठिकाणी गस्त घालणे, त्यांची
विचारपूस करणे याबाबतही पोलीस विभागाला सांगण्यात येईल
असंही गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.