भारताचा मोठा निर्णय; चिनी गेम्स, वेबसाईट आणी काही ऍप्स वर बंदी?
नवी दिल्ली | तब्बल ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातल्यानतंर सरकार आता आणखी २० अॅप्सच्या डेटा शेअरिंग पॉलिसीची समीक्षा करत आहे. ज्या कंपन्यांचे सर्व्हर चीनमध्ये आहेत, त्या कंपन्यांवर बंदी घातली जाऊ शकते. एवढेच नाही, तर आयटी मंत्रालय काही वेबसाइट्सवरही बंदी घालू शकते. सरकार ज्या २० अॅप्सवर डाटा शेअरिंग पॉलिसीची समीक्षा करत आहे, त्यात अनेक गेमिंग अॅप्सचादेखील समावेश आहे.
केंद्र सरकारने इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अॅक्ट, २००० च्या कलम ६९ अ नुसार ५९ चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे. लडाखमधील गलवान खो-यातील सीमेवर भारत-चीन तणाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर भारत सरकारने हे पाऊल उचलले. लष्करातील अधिका-यांनाही ८९ ऍप्स डीलीट करण्याचा आदेश याशिवाय सरकारने भारतीय सैन्य दलांतील अधिका-यांना आणि सैनिकांना फेसबूक-इंस्टाग्राम अकाउंट्स डीलीट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय इतर ८९ अॅप्सची यादीही जारी करण्यात आली आहे.
जे ऍप्स मोबाईलमधून अनइंस्टॉल करण्यास सांगण्यात आले आहे. आदेशानुसार, हे अॅप्स सर्वांना १५ जुलैपर्यंत डेलीट करायचे आहेत. यामध्ये वुईचॅट, हाईकसारखी मेसेंजर अॅप्स, पब्जीसारखे गेमिंग अॅप्स, डेटिंग अॅप्समध्ये टिंडर, ओकेक्युपीड आदी अॅप्स, तसेच डेली हंट या न्यूज अॅपचाही समावेश आहे.