खा. उदयनराजेंनी घेतली रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक!
पुणे | पुणे विभागीय रेल्वे बोर्ड कार्यालयात विभागीय रेल्वे मॅनेजर रेणू शर्मा यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सातारा जिल्ह्यातील सुरू असलेल्या व पुढील काळात सुरू होणाऱ्या कामांचा आढावा घेतला.
यावेळी प्रामुख्याने सुरू असलेल्या पुणे मिरज रेल्वे डबलिंग ट्रॅक च्या संदर्भातील शेतकऱ्यांच्या भूसंपादन च्या अडचणी तसेच इतर अडचणींवर चर्चा झाली व त्या सोडवून कामाला गती देण्याच्या सूचना केल्या त्याचबरोबर पुणे मिरज इलेक्टरीफिकेशन कामाचाही आढावा घेण्यात आला व लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या.
या बैठकीमध्ये सातारा पुणे लोकल रेल्वे चालू व्हावी तसेच जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशन हे सुसज्ज व दिमाखदार करण्यात यावेत तसेच रेल्वेरूळामुळे कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होता कामा नये अशी आमची भूमिका आहे. यावेळी प्रलंबित असलेल्या रेल्वेच्या कामाचा आढावाही घेण्यात आला.
देऊर, वाठार स्टेशन, तांदुळवाडी आधी ठिकाणी रेल्वे फाटक आहेत तिथे मोठे ब्रिज पुल होणार असून या विविध भागांचा भविष्याचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.तसेच कराड चिपळूण रेल्वे मार्गासाठीच्या निधी साठी मागील रेल्वे अर्थसंकल्पीय बजेट मध्ये तरतूद व घोषणा करण्यात आली होती