अखेर 10 वी आणि 12वीच्या निकालाची तारीख झाली फायनल; या तारखेला लागणार निकाल!
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून १०वी, १२वीचे निकाल पुढे ढकलण्यात आले होते. निकाल कधी लागणार? याकडे विद्यार्थी लक्ष लाऊन बसले होते. मात्र आत्ता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. अखेर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने १० वी आणि १२ वीच्या निकालाबाबत महत्वपूर्ण घोषणा केली आहे. येत्या १५ जुलै पर्यंत १२ विचा निकाल तर जुलै अखेर पर्यंत १० विचा निकाल लागणार असल्याचे बोर्डाने तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या अनेक दिवसांची प्रतीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा निकाल सरकारी वेबसाईट वर प्रसारित होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निकाल पाहण्यासाठी गर्दी करू नये असेही आव्हान यावेळी करण्यात आले.
निकाल पाहण्यासाठी लिंक खाली दिली आहे!
www.mahresult.nic.in महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेस्थळावर जाऊन निकाल पाहू शकता.
त्यासाठी आपला परीक्षा क्रमांक, रजिस्टर नंबर, जन्मतारीख टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
तुमचा निकाल तुमच्यापुढे शो होईल.
त्याचबरोबर तुमचा निकाल तुम्ही डाऊनलोड देखील करू शकता.