स्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख!
“#अरे_तुझ्या_आईला…” हा शब्द प्रत्येकाच्या तोंडुन एकायला मिळतो..एवढच नाही तर मदरचोद, भेंचोद, आईघाल्या, व अश्या कित्येक प्रकारच्या स्त्री ला नागड करणार्या शिव्या आपन रोज एकतो.. पण याच जागेवर आपण फादरचोद, भाईचोद, बापघाल्या अश्या शिव्या का नाही वापरत हा प्रश्न मला नेहमीच पडतो.. विचार तर करा आईने एवढ्या वेदना सहन करून तुम्हाला जिथुन जन्म दिलाय त्याच अव्ययावर शिव्या देने तुम्हाला योग्य वाटतय का?
घरात कुणी लहान मुलगा रडत असला कि ” काय मुलीं सारख रडतो र्” हे आपल्या प्रत्येकाच्याच घरात एकायला मिळत..का हो ? का नाही रडाव पुरूषांनी ?पुरूष म्हणजे अगदी शुर वीर पराक्रमी आणि स्त्री म्हणजे काही तरी तुच्छ का ?मी तर म्हणते रडाव पुरूषांनी तेही अगदी वाटेल तेवढ आणि वाटेल तस.. त्यांनाही रडुन मन मोकळ करायचा अधिकार आहे..
तिसरी गोष्ट म्हणजे आपल्यात नपुंसक लोकांची फार खिल्ली उडवल्या जाते.. कधी कधी तर एखाद्या मुलाने काही केल्यास”काय छक्क्या/हिजड्या सारख करतोय” अस देखील एकायला मिळत.. पण नपुंसक म्हणजे अर्धा पुरूष आणि अर्धी स्त्री पण तरीही त्याला स्त्री वरूणच शिव्या द्यायच्या.. म्हणजे आलच परत स्त्री वर.. खरं तर ते ही आपल्या सारखी माणसं आहेत.. लागल्यावर त्यांना ही दुखतं.. त्यांच ही रक्त लालच.. मागासवर्गीयांचाही कधी असाच विटाळ होत होता.. म्हणुन या मधे त्यांची काही चुक नसुन त्यांच्या तिल क्रोमोझोम्स ची आहे..
स्त्री ही श्रुष्टी ची निर्मातातरी प्रत्येक गोष्टीत तिलाच दोषदिला जातो..
तिने कशे कपडे घालावे,
पंजाबी ड्रेस घालावा कि
जिन्स कि शॉर्टस् हे सुद्धा तिला स्वतः च्या मनाने घालन्याचा अधीकार नाही..
आणि तिच कैरेक्टर हे तिच्या कपड्यांवरूण ठरवल जातं..
आणि हे ठरवणारे तिच आई-बहिनीवर शिव्या देणारी मुलं..
मुलाने मात्र उघडं सगळं गाव भर फिराव पण मुलिच्या ड्रेस मधुन थोडा स्लिप चा बेल्ट बाहेर काय आला तिला “#बघ_ईशारे_देतिये” म्हणुन संबोधित करण..
त्याने मात्र गावभर पोरी फिरवायच्या पण तिचे काही मित्र असले तर तिला वैश्या म्हणायच..
त्याने रात्र भर बाहेर फिरायच पण तिला मात्र बाहेरूण घरी यायला रात्र झालीस तर तिला रेट विचारायची..
ति पातळ असली तरी टोमणे,
जाड असली तरी टोमणे,
ति काळी असली तरी तेच,
ति गोरी असली तरी तेच,
ति सलवार वर असली तरी छेडतात,
जिन्स वर असली तरी छेडतात,
ति शांत असली तरी बदनामी,
ति मस्तीखोर असली तरी बदनामी..आणि
ति कुणाला बोलत नसली तर “#एवढा_कशाचा_एटिट्युड_आहे_कुत्री” असे म्हणुन बोलने आणि
जर ती सर्वांना बोलत असली तर”#सर्वांना_लाईन_देते_साली_छिन्नाल” असे त्यांचे बोलने..
आणि असला हा मानसिक बलात्कार स्त्री ला रोज सहन करावा लागतो.. प्रत्येक मुलगा स्त्री ला छेडतो अस नाही पण अशी एक ही स्त्री नाही जी मुला कडुन छेडल्या गेलेली नाही, जिच्यावर नजरांचा बलात्कार झालेला नाही..
आणि या मधे चुक त्या मुलांची नाही त्यांच्या सडक्या मेंदुची आहे..
आहो एकदा निरिक्षण तर करा जे अव्यय आम्हाला आहेत तसेच सेम तुमच्या आई-बहिनींना आहेत..
काय फर्क पडतो आई-बहिन आपली असो कि दुसर्यांची तिची ईज्जत करा..
स्त्री नी कस असाव या पेक्षा पुरूषांनी कुठे बघाव, काय बोलाव याचे आहेत का हो कुठे दाखले..?
जर डोळ्यातली नजर आणि पायातली चप्पल मजबूत असेल तर् कुणाची ही स्त्री छेडण्याची हिम्मत होणार नाही पण जरी झालिच एखाद्या बहाद्दराची हिम्मत तर “बाई कापून ये पण बरबाद होऊन येऊ नकोस” अशी हि तिला भित्र, बंदिस्त बनवण्यापेक्षा जिजाऊची शिकवण दिली पाहिजे तरच् प्रत्येक स्त्री मध्ये जिजाऊ आणि मुला मध्ये शिवराय दिसू लागतील.