महाविकास आघाडी सरकारला WHO कडून कौतुकाची थाप!

Spread the love

मुंबई| आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी
असलेल्या धारावीनं कोरोनाविरोधातील लढा यशस्वी
करुन दाखवला आहे. कोरोना रुग्णांचा सर्वाधिक आकडा
आढळून आलेल्या धारावीत प्रशासनाच्या उपाययोजनांचा
परिणाम म्हणून कोरोना संक्रमणात मोठया प्रमाणात घट
झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही आता याची
दखल घेण्यात आली आहे.

WHO कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र आले असून
या पत्रात ठाकरेंचं कौतुक करण्यात आल आहे. वर्ल्ड हेल्थ
ऑर्गनायझेशनचे प्रमुख टेड्रोस अडॅनॉम गेब्रेयसिस म्हणाले
की, कोरोनाचं संक्रमण वेगानं झाल्यावर सरकारनं त्यावर
नियंत्रण मिळवल्याचं धारावी हे उत्तम उदाहरण आहे
धारावीतील झोपडपट्टीच्या भागात कोरोनाचा शिरकाव
झाल्यानं प्रशासनाकडूनही चिंता व्यक्त केली जात होती.
कोरोना संक्रमितांचा आकडा दररोज वेगाने वाढू लागला.
मात्र यावर अटकाव घालत मुंबई शहरातील धारावीच्या
हॉटस्पॉटने आता कोरोनामुक्तीच्या दिशेनं पाऊलं टाकली
आहेत.

जवळपास साडेसहा लाख लोकसंख्या असलेली धारावी
झोपडपट्टी अडीच किलोमीटरच्या परिसरात पसरलेली
आहे. या भागात अत्यावश्यक आरोग्य सुविधा व कोरोनाची
संक्रमणाची साखळी तोडायला प्रशासनाला बरीच
तारेवरची कसरत करावी लागली.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.