चला तर मग पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे लॉकडाऊन चे नियम जाणून घेऊयात!

Spread the love

पिंपरी/चिंचवड |  पिंपरी चिंचवड शहरातील कोवीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंध करण्यासाठी शहरात मंगळवार दि १४ जुलै पासून २३ जुलै २०२० रात्री १२ वाजेपर्यंत 10 दिवस संपूर्ण लाॅकडाऊन करण्याचे आदेश पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज जाहीर केले आहेत. या काळात नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

अश्या प्रकारे असेल लॉकडाऊन आणि त्याचे नियम पुढीलप्रमाणे:

१ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील खालिल अस्थापना संपूर्ण बंद राहतील . सर्व किराणा दुकान , सर्व किरकोळ व ठोक विक्रेते , सर्व इतर व्यावसाय करणारे व्यापारी दुकाने दिनांक १४/०७/२०२० ते १८/०७/२०२० पर्यंत संपूर्णतः बंद राहतील . तदनंतर दिनांक १ ९ / ०७ / २०२० ते २३/०७/२०२० या कालावधीत सकाळी ०८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरु राहतील , इतर सर्व दुकाने व अस्थापना बंद राहतील .

2 . स्विगी, झोमॅटो व आदी ऑनलाईन पोर्टलवरुन मागविले जाणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा दि . १४/०७/२०२० चे ०१.०० am ते दिनांक २३/०७/२०२० रोजीचे २४.०० वाजेपर्यंत बंद राहतील , सार्वजनिक / खाजगी क्रिडांगणे / मोकळया जागा , उद्याने , बगीचे हे संपूर्णतः बंद राहतील . तसेच सार्वजनिक ठिकाणी Morning walk व Evening walk प्रतिबंधीत राहील . d . उपहारगृह , बार , लॉज , हॉटेल्स ( वंदे भारत योजने अंतर्गत कोविड -१ ९ करीता वापरात असलेले वगळुन ) , रिसॉर्ट , मॉल , बाजार , मार्केट संपूर्णत बंद राहतील . सर्व केश कर्तनालय / सलुन / स्पॉ / ब्युटी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद राहतील .

3 . सर्व किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे मोंढा / मंडई / आडत भाजी मार्केट / फळे विक्रेते / आठवडी व दैनिक बाजार / फेरीवाले हे सर्व ठिकाणी दिनांक १४/०७/२०२० ते १८/०७/२०२० पर्यंत संपूर्णतः बंद राहतील . तदनंतर दिनांक १ ९ / ०७ / २०२० ते २३/०७/२०२० या कालावधीत शेतकरी आठवडी बाजार तसेच भाजी व फळांचे विक्री करणारे अधिकृत फेरीवाले यांचे मार्फत करण्यात येणारी बिक्री सकाळी ०८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत चालु राहील . मटन , चिकन , अंडी , मासे इत्यादी ची विक्री दिनांक १४/०७/२०२० ते १८/०७/२०२० पर्यंत संपूर्णतः बंद राहतील . तदनंतर दिनांक १ ९ / ०७ / २०२० ते २३/०७/२०२० या कालावधीत सकाळी ०८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत चालु राहतील .

4. शाळा , महाविद्यालय , शैक्षणीक संस्था , प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील . सार्वजनीक व खाजगी प्रवासी वाहने- दोन चाकी , तीन चाकी व चार चाकी संपूर्णतः बंद राहतील तथापि , अत्यावश्यक सेवेतील वाहने , पुर्व परवानगी प्राप्त वाहने तसेच विमानतळ , रेल्वे स्टेशन येथे जाणे येणे करीता व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापर अनुज्ञेय राहील . शहरातील सार्वजनिक व खाजगी बस सेवा , ट्रक , टेम्पो , ट्रेलर , ट्रॅक्टर इत्यादीसाठी संपूर्णतः बंद राहतील .

5. तथापि , कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे . पोलिस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागांचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणान्या कर्मचारी व वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहेत.तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहे .

6. सर्व प्रकारचे बांधकाम / कंस्ट्रक्शनची कामे संपूर्णतः बंद राहतील तथापी ज्या बांधकामाच्या जागेबर कामगारांची निवास व्यवस्था ( In – Situ construction ) असेल त्यांना काम सुरू ठेवता येईल .

7. सर्व चित्रपटगृह , व्यायामशाळा , जलतरण तलाव , करमणूक उद्योग , नाटयगृह , बार , प्रेक्षागृह , सभागृह संपूर्णतः बंद राहतील .
सर्व प्रकारचे मंगल कार्यालय , हॉल तसेच लग्न समारंभ , स्वागत समारंभ संपूर्णतः बंद राहतील . तसेच सर्व प्रकारचे मंगल कार्यालय , हॉल तसेच लग्न समारंभ , स्वागत समारंभ संपूर्णतः बंद राहतील . मात्र यापुर्वि परवानगी घेतलेले लग्न समारंभ २० पेक्षा कमी व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये आयोजीत करता येतील . सामाजीक / राजकीय / क्रिडा / मनोरंजन सांस्कृतीक / धार्मीक कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद राहतील . धार्मीक स्थळे / सार्वजनिक प्रार्थनास्थळे संपूर्णतः बंद राहतील . पिंपरी चिंचवड शहरातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील . ऑनलाइन कुरियर सेवा उदा . Amazon , Flipkart व तत्सम सेवा १४/०७/२०२० ते १८/०७/२०२० पर्यंत संपूर्णतः बंद राहतील . तदनंतर दिनांक १ ९ / ०७ / २०२० पासुन चालु राहतील .

8 . तथापि , खालील अत्यावश्यक बाबी / सेवा मर्यादीत स्वरुपात व निबंधासह सुरु राहतील . दुध विक्री व दुधाचे घरपोच वितरण संपुर्ण कालावधीत अनुज्ञेय राहील . सर्व खाजगी व सार्बजनिक वैद्यकीय सेवा , पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमीत वेळेनूसार सुरु राहतील . सर्व रुग्णालये व रुग्णालयाशी निगडीत सेवा आस्थापना त्यांचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतील व कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेऊन रंग्णांना आवश्यक सेवा नाकरणार नाही . अन्यथा संबंधित रुग्णसेवा संस्था कारवाईस पात्र राहील ,

9 . सर्व मेडीकल दुकाने तसेच ऑनलाईन औषध वितरण सेवा संपुर्ण कालावधी करीता सुरु राहतील . सर्व मा . न्यायालये व राज्य शासनाचे केंद्र शासनाचे कार्यालये तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये तसेच सर्व खाजगी कार्यालये महाराष्ट्र शासनाचे संदर्भ क्र ४ नुसार दिनांक २ ९ / ०६ / २०२० चे आदेशानुसार १० % कर्मचारी वर्गासह सुरु राहतील . शक्य असल्यास work from home चा पर्याय वापरण्यात यावा , कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक पास मनपा मार्फत उपलब्ध करून दिले जातील . याकरिता संबंधीत आस्थापनेचे विभाग प्रमुख शासनाच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक कर्मचाऱ्यांची सूची प्रमाणित करून मनपा कार्यालयास सादर करतील .

10. पेट्रोलपंप व गॅसपंप सकाळी ९ .०० ते दुपारी २.०० या वेळेत सुरु राहतील व ते केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहनास इंधन पुरवठा करतील . एलपीजी गॅस सेवा घरपोच गॅस वितरण नियमानुसार राहील . औद्योगीक व इतर वस्तुंची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक , अंतरजिल्हा , अंतरराज्य वाहतुक शासकीय नियमानुसार सुरु राहील . दैनिक वर्तमानपत्रे , नियतकालिके यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल / प्रिंटमिडीया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरु राहतील . वर्तमानपत्रांचे वितरण सकाळी ६ ते ९ या वेळेमध्येच अनुज्ञेय राहील .

11 . पाणीपुरवठा करणारे टैंकरला नियमानुसार परवानगी राहील . संस्थात्मक अलगिकरण / विलगीकरण व कोविड केअर सेंटर करता महानगरपालिकेने ताब्यात घेतलेल्या व मान्यता दिलेल्या कार्यालयाच्या जागा , इमारती नियमानुसार सुरू राहतील , सर्व राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बँका नियमानुसार किमान मनुष्यबळासह सुरु राहतील . बँकेच्या इतर ग्राहकसेवा जसे ऑनलाईन , एटीएम सेवा सुरु राहतील . संपुर्ण पिंपरी चिंचवड शहराचे हददीतील मा . न्यालायाचे कर्मचारी , अधिकारी , मा . न्यायाधीश वकील , शासकीय राज्य / केंद्र शासनाचे कर्मचारी , शासन अंगिकृत कर्मचारी , डॉक्टर नर्स , अंगणवाडी,आशा वर्कर , वर्तमानपत्र , प्रिंटीग व डिजीटल मिडीयाचे कर्मचारी , फार्मा व औषधी संबधित मेडीकल शॉपचे कर्मचारी , दुध विक्रेते , अत्यावश्यक सेवा जसे कृषी , बी – बियाणे , खते , गॅस वितरक , पाणी पुरवठा , आरोग्य व स्वच्छता करणारे शासकीय व खाजगी कामगार , अग्निशमन सेवा , जलनिःसारण तसेच पूर्वपावसाळी व पावसाळ्यादरम्यान करावयाची अत्यावश्यक कामे करणारे , वीज बहन व वितरण | कंपनीचे कर्मचारी , महानगरपालिकेचे कर्मचारी , पोलीस विभागाचे कर्मचारी , महसुल विभागाचे कर्मचारी तसेच कन्टेमेंट झोन करीता नियुक्त कर्मचारी यांनाच चारचाकी , दुचाकी ( स्वतःकरीता फक्त ) वाहन वापरण्यास परवानागी राहील . या सर्व कर्मचारी / अधिकारी यांनी स्वतःचे कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीस कर्मचारी सोडुन इतरांनी स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवावे व वाहनाचे आवश्यक परवाने सोबत ठेवावे . या सर्वांना बाहन फक्त शासकीय कामासाठी अथवा त्यांचे कामाचे जबाबदारी नुसार व शासकीय अथवा त्यांच्या संस्थेने दिलेल्या वेळेतच वापरता येईल ,

12. औषध व अन्न उत्पादन , सलग प्रक्रिया आणि निर्यात उदयोग व त्यांचे पुरवठादार नियमानुसार चालु राहतील व यासाठी एम.आय.डी.सी.पोर्टल वरुन यापुर्वी देण्यात आलेल्या परवानग्या ग्राहय धरण्यात येईल . अद्याप परवानगी न घेतलेल्या उद्योगांनी एम.आय.डी.सी.पोर्टल बरुन परवानगी प्राम करावी . पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रामध्ये सुरू असलेले स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्प , मेट्रो , स्मार्ट सिटी , राष्ट्रीय महत्वाचे प्रकल्प इ . यांने पिंपरी चिंचवड महानगपालिके कडे [email protected] वर अर्ज करुन पुर्व परवानगीसह सुरू ठेवता येईल .

13. सर्व औद्योगिक आस्थापना उत्त कालावधीत सुरू राहतील . पिंपरी चिंचवड शहरातुन परवाना असलेल्या उदयोगाना उदयोग क्षेत्रात जाण्यासाठी आणि परतीसाठी फक्त चार नाकी वाहन किंवा निश्चीत केलेल्या बसमधुनच प्रवासाला परवानगी राहील . कर्मचाऱ्यांनी त्यांची ओळखपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक राहील . तथापी , ज्या औद्योगिक आस्थापनामध्ये कोवीड -१ ९ चा रूग्ण आढळून येईल त्यामधील सर्व कामगारांची कोवीड -१ ९ ची तपासणी स्वखर्चाने करणे बंधनकारक राहील . दरम्यानच्या कालावधीत उद्योग बंद ठेवण्यात यावा . प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यक्तीसच फक्त कामावर उपस्थित राहता येईल .

14. पिंपरी चिंचवड शहरातील एम.आय.डी.सी. किंवा खाजगी जागेवरील उदयोग चालु राहणार असल्यामुळे त्यांना आवश्यक ने पास पिंपरी चिंचवड महानगपालिके कडे [email protected] बर अर्ज करून पुर्व परवानगीसह कामगारांची वाहतुक निश्चीत बसने करता येईल . माहिती तंत्रज्ञान उद्योग १५ % कर्मचारी क्षमतेसह सुर ठेवता येतील . शक्य असल्यास work from home चा पर्याय वापरण्यात यावा . जे उद्योग कामगाराची १० दिवस फॅक्टरीमध्ये निवास व्यवस्था करणार त्यांना उद्योग चालु ठेवण्यास कोणतीही अडचण नाही .

15. शेतमालाशी कृषि निगडीत प्रक्रिया उद्योग नियमानुसार चालु राहतील . सर्व वैद्यकीय व्यावसायीक , परिचारीका , पॅरामेडिकल कर्मचारी , सफाई कर्मचारी व अॅम्बुलन्स यांना शहराअंतर्गत वाहतूकीसाठी परवानगी राहिल . वृध्द व आजारी व्यक्तींकरीता नियुक्त केलेले मदतनिस यांच्या सेवा सुरु राहतील . जीवनावश्यक वस्तूंचे , औषधांचे व तयार अन्न पदार्थाचे घरपोच वाटप सकाळी ८:०० ते रात्री १०.०० या कालवधीतच मनपाच्या पूर्व मान्यतेने पास घेवून अनुज्ञेय राहिल . सदर सुविधेकरीता फक्त मनपाच्या अधिकाऱ्यांनी याद्वारे निर्गमीत करण्यात आलेला पास ग्राहय धरण्यात येईल.

यावेळी सर्वांनी शासनाला सहकार्य करून आपण सर्वांनी मिळून कोरोनाला हरविण्याचे काम एकत्रित करूयात असेही यावेळी सांगण्यात आले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.