नागपूर | मालमत्ता खरेदी करण्याच्या बेतात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खरेदी-विक्री व्यवहारावर लागणारी स्टॅम ड्युटी कमी करण्यात आले आहे. शहरी भागात तीन तर ग्रामीण भागात फक्त दोन टक्केच स्टॅम ड्युटी लागणार आहे. 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होतील. यामुळे घर खरेदीच्या प्रयत्नात असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला असून, यामुळे घराचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे. रिअल इस्टेटच्या व्यवसायालाही गती येणार असल्याचे बोलले जात आहे. कोरोनामुळे अनेक उद्योग बंद पडले, रोजगारावर संकट आले. याचा थेट परिणाम अनेकांवर झाला. नोटबंदी आणि जीएसटीमुळेही मोठा परिणाम या रिअल इस्टेटच्या व्यवसायावर झाला आहे. लोकांच्या हातात पैसे नसल्याने लोकांनी घर घेण्यापासून फारकत घेतली. रेडीरेकनरचे दरही जास्त असल्याचा परिणाम जाणवत होता.
त्यामुळे गेल्या दोन वर्षात रेडीरकनरच्या दरात फारशी वाढ करण्यात आले नाही. यंदातर रेडीरेकनरचे दर जैसे थे ठेवण्यात आले होते. परंतु, त्यानंतरही रिअल इस्टेटच्या व्यवसायात फारशी तेजी आली नाही. त्यामुळे आता सरकारने स्टॅम ड्युटीस आणखी घट करण्याचा निर्णय घतला. यानुसार दोन टक्के स्टॅम ड्युटी तर एक टक्का अधिभार कमी करण्यात येणार आहे. एक सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होतील.