बारामती | बारामती तालुका भागातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा दोन वर्षांनंतर सुरु झाल्याने विद्यार्थीचा आनंद गगनात मावेनासा झाला. तसेच ऑनलाईन क्लास करुन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. बारामती तालुका येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलC.B.S.E,विद्यानगरी, बारामती. येथील विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी त्यांचं स्वागत केले. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एका बाकड्यावर एका विद्यार्थीला बसविण्यात आले तर शाळेत आल्यावर सॅनिटायझरसह ऑक्सिजन पातळी ताप इ. आरोग्य तपासणी करण्यात आली.
अनेक दिवसानंतर शाळा सुरू झाल्याने शिक्षक, मित्र, मैत्रिणी यांना भेटण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कोरोना नियमांचे पालन करत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती मुख्याध्यापिका सौ.राधा कोरे व क्रीडाशिक्षक पारस बाबर व संजय लोंढे यांनी दिली.