Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

आम्ही फक्त तीनच राजेंना मानतो; डॉ प्रकाश आंबेडकरांची नव्या वादात उडी!

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले आमनेसामने आले आहेत. उदयनराजे बिनडोक असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केल्यानंतर उदयनराजे समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं होतं. आता त्यालाच डॉ प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे. पुतळे जाळा, काहीही केले तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाहीत. ही भूमिका वैचारिक आहे आणि ती कायम राहील, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आंबेडकर आणि राजेंममधला वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version