Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा 4थ्या वर्धापनदिन होणार दिमाखात साजरा; मोबाईल ऍप होणार लॉन्च!

Spread the love

ठाणे | ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ आणि ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन‘ यांच्या सयुंक्त विद्यमाने ४ थ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत स्वतःच्या जीवाची बाजी लावून एका सेवाभावी सैनिकाच्या भूमिकेतून निस्वार्थी रुग्णसेवा केलेल्या ‘कोविड योद्धांना’ सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या रविवारी दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, ठाणे (पश्चिम) येथे एका दिमाखदार कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील निवडक सामाजिक कार्यकर्त्यांना ‘कोविड योद्धा सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे.

https://online.flippingbook.com/view/910889212/

या व्यतिरिक्त ज्या रुग्णालयांनी या कोविड संकट काळात कोरोना बाधितांना अविरत – अविश्रांत सेवा दिली अशा महाराष्ट्रातील निवडक ५० रुग्णालयांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री श्री. आदित्यजी ठाकरे, नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. एकनाथजी शिंदे, राज्यमंत्री मा.अदितीताई तटकरे, राज्यमंत्री मा. श्री. बच्चू भाऊ कडू, श्री.वरुणजी सरदेसाई, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, एबीपी माझा वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक श्री.राजीवजी खांडेकर, महाराष्ट्र डिजीटल मिडिया संपादक, पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.राजा माने, चित्रपट अभिनेते श्री.मंगेश देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते ‘कोविड योद्धा सन्मान’ सोहळा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पहिल्या सत्रात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या ‘वेबसाईट’ व ‘मोबाईल अँप’ चा उद्घघाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला माजी राज्यपाल मा.पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील, मा.खा.श्री संजय राऊत, आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री.अमित देशमुख, आरोग्य राज्यमंत्री श्री.राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्यमंत्री श्री.विश्वजित कदम, झी २४ तास वृत्तवाहिनी चे मुख्य संपादक श्री.निलेश खरे, खा.श्री.राजन विचारे, आ.श्री.प्रताप सरनाईक, ठाणे शहराचे महापौर श्री.नरेश म्हस्के तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व लोक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. उद्घघाटन सोहळ्यानंतर आरोग्य परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात सिने अभिनेते श्री.शरद पोंक्षे, जुपिटर हॉस्पिटल येथील हृदयरोग तज्ञ श्री. विजय सुरासे, जेष्ठ पत्रकार श्री. संतोष आंधळे, जेष्ठ पत्रकार श्री. संदीप आचार्य आदी सहभागी होणार आहेत. तर परिसंवादाचे सूत्र संचालन न्यूज १८ लोकमत चे जेष्ठ पत्रकार श्री. मिलिंद भागवत करणार आहेत. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन निवेदक श्री. राजेंद्र पाटणकर करणार आहेत.

या कार्यक्रमाला जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मार्गदर्शक खा.डॉ.श्रीकांत शिंदे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख श्री.मंगेश चिवटे यांनी केले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य डिजीटल पत्रकार संघटनेचे सहकार्य लाभले असून, ठाणे शहरातील अग्रगण्य दैनिक ठाणे वैभव, समाज माध्यमांवरील लोकप्रिय वेब पोर्टल बोल भिडू, ठाणे लाईव्ह, महाराष्ट्र माझा मिडिया पार्टनर म्हणून असणार आहेत. कार्यक्रमाच्या मध्यंतरानंतर स्नेह भोजनाची तर कार्यक्रमाच्या समारोपानंतर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

Exit mobile version