Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

पुण्यात कोरोनाला हरविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न!

Spread the love

पुणे | पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांत तर मुंबईला देखील मागे टाकणारी आकडेवारी समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता ‘पुणे’ हाती घेत गुरुवारी पुण्यात दाखल झाले होते, आगामी काळात कोरोनासंबंधीच्या उपाययोजना यांवर मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. पुण्यातील विधानभवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

आजच्या बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पिंपरी-चिंचवडच्‍या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम,  तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

31 ऑगस्टअखेरपर्यंत पावणे दोन लाख रुग्ण पुणे शहरामध्ये असण्याची शक्यता आहे. तसेच आजही कोरोना बाधित रुग्णांना बेड मिळत नाही. ऑक्सिजन बेडच्या अनुपलब्धतेमुळे अनेक रुग्णांचा जीव टांगणीला आहे. दहा-दहा ठिकाणी फोन केल्यानंतही बेड उपलब्ध होत नाही. सध्याच्या  अनेक खाजगी हाॅस्पिटलकडून सहकार्य मिळत नाही. 80 टेक्के बेड ताब्यात घेतले पण तरीसुद्धा समन्वायच्या अभावी बेडची व्यवस्था झालेली नाही. रुग्णांवरील उपचारासबंधीच्या बिला संदर्भात खूप तक्रारी आहेत. शासनाच्या स्तरावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. टेस्टिंग कॅपिसिटी वाढवली आहे. अँटिजन टेस्ट मनपाला सहकार्य केले पाहिजे.

आता पर्यंत 300 कोटीचा कोरोनावर खर्च केला. मोठा खाजगी हाॅस्पिटल सोबत करार केले. शहरातील 80 हाॅस्पिटल शहरी गरीबमध्ये करार केला . या अंतर्गत देखील कोरोना रुग्णांवर उपचार केला जातो. यासाठी दर महा 25 कोटी अतिरिक्त खर्च होतोय अश्या अनेक प्रकारच्या समस्या पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडल्या.

Exit mobile version