Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

अनिल देशमुखांच्या नागपूर सह मुंबईतल्या घरावरही इडीची छापेमारी!

Spread the love

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वरळी येथील निवासस्थानी देखील इडीची छापेमारी झाली आहे. नागपूर सह अन्य अनेक ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. आज सकाळी ९ वाजता एक ईडीची एक टीम मुंबईत ज्ञानेश्वरी बंगल्यावर आली आहे. तिथे बंगल्यात एकच टीम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिथे 8 अधिकारी झडती घेत असल्याची माहिती आहे.

मुंबईचा माजी पोलिस अधिकारी सचीन वाझेला १०० कोटींची वसुली करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी आज सकाळीच ईडीचा छापा पडला. आज सकाळीच ईडीचे अधिकारी नागपुरात ईडीचे अधिकारी देशमुख यांच्या निवासस्थानी पोहोचले असून त्यांनी चौकशी सुरु केली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी देशमुख यांनी केलेल्या आरोपानंतर सीबीआयने देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर आता देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई सुरु केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या कारवाईबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”राजकारण विचारांचे असते भाजप एजन्सीचा वापर करत आहे. पवार साहेबाना ईडीची नोटीस पाठवली होती तेव्हा पासून आम्ही भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचे पाहतो आहोत. आमचं राजकारण विकासाचं आहे. देशात अडचणी असताना एक मोठा पक्ष सुडाचे राजकारण करत आहे,” असे त्या म्हणाल्या.

”अनिल देशमुख यांच्या घरी ईडीचा थापा पडला आहे. काही दिवसांनी जेल मधे रवानगी होणार. घोटाळ्याचा पैसा कोलकत्ता कंपन्या द्वारा स्वतःचा कंपन्या मधे वळविला. छगन भुजबळ अशाच प्रकारचा घोटाळ्या मुळे ३ वर्ष जेल मधे होते, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.”

Exit mobile version